नागपूर शहरातील विविध संस्थांकडून जी-२० अंतर्गत सी-२० परिषदेची तयारी सुरू असून मेट्रोच्या एअरपोर्ट साऊथ स्थानकावर जी -२० संकल्पनेवर आधारित १३० फूट उंचीची ३-डी प्रतिमा लावण्यात आली आहे. ती देशातील एकमेव असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे.

हेही वाचा >>>बुलढाणा: ‘देवेंद्र अंकल ऐकाना… माझ्या पप्पांना जुनी पेंशन द्याना’; संपकऱ्यांच्या वाहन रॅलीतील बालकाने वेधले लक्ष

pune ring road,
पुणे : रिंगरोडमध्ये परदेशी कंपन्यांना रस
houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे
pune metro station marathi news, pune metro marathi news
पुणे: स्थानकांच्या नावातून मेट्रो मालामाल! वर्षाला कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या महामेट्रोचा फंडा
Passengers are monitored through cameras based on AI technology in Pune railway station
सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत

प्रतिमेत जी-२० आणि महामेट्रो नागपूर लोगोचा समावेश आहे, ही प्रतिमा १३०फूट रुंद आणि २०फूट उंच असून तिचे वजन सुमारे एक हजार किलो आहे.संपूर्ण साहित्य फायबर रीइन्सफोर्ट प्लास्टिकने बनविण्यात आले आहे. तीन हजार चौरस फूट जागेत ही प्रतिमा बसवण्यात आली असून त्याला ‘थिम पार्क’ असे नाव देण्यात आले आहे. विविध सजावटीच्या वस्तू आणि फुलांच्या रोपांनी हे उद्यान सजवले जाईल. त्यात अभ्यागतांसाठी बसण्याची आणि स्केटिंग आणि लहान मुलांच्या मनोरंजनाची व्यवस्था असेल. भारताच्या स्वातंत्र्या अमृत महोत्सवानिमित्त यापूर्वी नागपूर मेट्रोने झिरो माइल स्थानकाजवळ फ्रीडम पार्क तयार केला आहे. आता जी-२० च्या निमित्ताने परिषदेच्या संकल्पनेवेर आधारित पार्क तयार केला आहे.