नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील बल्लारपूर ते गोंदिया मार्गावरील गोंदिया – हिरडामली दरम्यान वळण रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी १४ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे १८ ते २० जून कालावधीत या मार्गावरील अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहे. तसेच काही गाड्या रद्द करण्यात येत आहेत.

गोंदिया ते बल्लारपूर दरम्यान एक वळण मार्ग तयार करण्यात येत आहे. ते सुरू करण्यासाठी सांधे जोडण्याचे काम तसेच सिंग्नलिंग यंत्रणा बसवण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी या मार्गावरील वाहतूक काही तीन दिवस प्रभावित राहणार आहे. यामध्ये काही गाड्यांना रद्द करण्यात येणार आहे. तर काही काहींचे मार्ग गाडी क्रमांक ०८८०२ गोंदिया ते बल्लारपूर मेमू पॅसेंजर आणि क्रमांक ०८८०१ बल्लारपूर ते गोंदिया मेमू पॅसेंजर १९ आणि २० जूनला रद्द करण्यात येत आहे.  गाडी क्रमांक ०७८२० गोंदिया ते बल्लारपूर मेमू पॅसेंजर आणि गाडी क्रमांक ०७८१९ बल्लारपूर ते गोंदिया मेमू पैसेंजर १९ आणि २० जूनला रद्द करण्यात येत आहे. तसेच गाडी क्रमांक ०८८०४ गोंदिया-बल्लारपूर मेमू पॅसेंजर आणि गाडी क्रमांक ०८८०३ बल्लारपूर ते गोंदिया मेमू पॅसेंजर १९ आणि २० जूनला रद्द करण्यात येत आहे.

या मेगा ब्लॉकमुळे तीन एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात बदलण्यात येत आहे. सिकंदराबाद येथून १८ जूनला निघणारी गाडी क्रमांक १७००७ सिकंदराबाद – दरभंगा एक्सप्रेस बल्लारपूर, नागपूर आणि गोंदिया मार्गे वळवली जाईल. १८ जूनला दरभंगा येथून निघणारी १७००८ दरभंगा – सिकंदराबाद एक्सप्रेस गोंदिया, नागपूर आणि बल्लारपूर मार्गे वळवली जाईल. तसेच यशवंतपूर येथून १८ जूनला निघणारी गाडी क्रमांक १२२५१ यशवंतपूर – कोरबा एक्सप्रेस बल्लारपूर, नागपूर आणि गोंदिया मार्गे वळवण्यात येईल.

नागपूर-सहडोल एक्सप्रेस नऊ दिवस रद्द

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागामध्ये मुदरिया येथे ‘नॉन इंटरलॉकिंग’चे काम करण्यात येत असल्याने नागपूरहून निघणारी नागपूर-सहडोल-नागपूर एक्सप्रेस १२ जूनपासून नऊ दिवस रद्द करण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या वाढत असते. याच काळात ही गाडी रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील अनुपपूर जंक्शन ते न्यू कटनी जंक्शनमधील मुदरिया येथे तिसऱ्या ‘लाईन कनेक्टिव्हिटी’च्या संदर्भात ‘नॉन-इंटरलॉकिंग’ कामासाठी ‘ब्लॉक’ घेणार आहे. त्यासाठी १२०१ नागपूर-सहडोल एक्सप्रेस १२ ते २० जून २०२४ पर्यंत आणि ११२०२ सहडोल-नागपूर एक्स्प्रेस १३ ते २१ जून २०२४ पर्यंत रद्द करण्यात येत आहे. उन्हाळ्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याने अनेकजण बाहेगावी, नातेईवाकांकडे जाण्याचा बेत आखतात. परिणामी, रेल्वेगाड्यांना उन्हाळ्यात गर्दी होत असते. आता रेल्वे याच काळात नागपूर-सहडोल एक्सप्रेस रद्द केल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.