अमरावती : मामाने आपल्या १४ वर्षीय भाचीचेच लैंगिक शोषण केले. ही धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील मुलताई तालुक्यातील एका गावात घडली. पीडित मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय तपासणीनंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीच्या शाळेला २२ जानेवारी रोजी सुटी होती. ती गावातील एका कार्यक्रमात जेवण करण्यासाठी गेली होती. परत येत असताना रस्त्यात तिला तिची मामी भेटली. त्यामुळे ती मामीसोबत त्यांच्याकडे गेली. मामी बाहेर गेल्‍यानंतर पीडित मुलगी व तिचा मामा हे दोघे घरी होते. त्याने तिचे लैंगिक शोषण केले. सदर घटनेनंतर पीडित मुलगी ही कशीबशी घरी पोहोचली. तिने घडलेला प्रसंग आईला सांगितला.

Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
Murder in Kolhapur 8 Suspects accused jailed within 24 hours
कोल्हापुरात खून; संशयित ८ आरोपी २४ तासात जेरबंद
badlapur, Kidnapping, Murder, Nine Year Old Boy, goregaon village, ambernath taluka, police, thane, crime news, marath news,
नऊ वर्षीय मुलाची अपहरण करून हत्या, अंबरनाथ तालुक्यातील गोरेगाव येथील घटना
maval marathi news, sexually assaulted and killed 6 year old girl
मावळात बालिकेवर अत्याचार करुन खून करणाऱ्या आरोपीला फाशी, आरोपीच्या आईला सात वर्ष सक्तमजुरी

हेही वाचा…बलात्कारातील तब्बल ७१ टक्के आरोपी सुटले निर्दोष! विनयभंगातील २९ टक्केच गुन्हेगारांना शिक्षा; बनावट गुन्हे किंवा बोगस तपासाचा परिणाम

दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला वरूड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आल्यावर कोतवाली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी रुग्णालय गाठून पीडित मुलीचा जबाब नोंदविला. त्या आधारावर कोतवाली पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर प्रकरण मध्यप्रदेशातील संबंधित ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे.