मित्राच्या मुलीवर युवकाचा बलात्कार

२३ मे रोजी दुपारी अडीच वाजता आरोपी ‌वैभव हा मुलीच्या घरी आला. त्याने मुलीशी अश्लील चाळे केले.

नागपूर : एका युवकाने मैत्रीचा गैरफायदा घेत मित्राच्या १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. दरम्यान मित्र घरी आल्यानंतर नको त्या अवस्थेत दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. वैभव रंगनाथराव बोंडवे (२१, रा. तांडवाडी, ता. आर्वी.वर्धा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलीचे वडिल हिंगणा परीसरात राहतात. ते आईसस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करतो. त्यांची वैभवशी मैत्री होती. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्याही घरी येणे-जाणे होते. वैभव हा नेहमी हिंगण्याला मित्राच्या घरी येत होता. त्याची वाईट नजर मित्राच्या १४ वर्षीय मुलीवर पडली. त्यानंतर मित्र घरी नसताना तो वारंवार घरी यायला लागला. २३ मे रोजी दुपारी अडीच वाजता आरोपी ‌वैभव हा मुलीच्या घरी आला. त्याने मुलीशी अश्लील चाळे केले. त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागला. दरम्यान, मुलीचे वडिल घरात आले असता त्याला तो नको त्या अवस्थेत दिसला. त्याला दोन कानशिलात लावल्यानंतर तो पळून गेला. मुलीसह वडिलांनी हिंगणा पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैभवविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 14 year old minor girl raped by father s friend in nagpur zws

Next Story
आर्णी येथे वऱ्हाडाच्या वाहनास अपघात, १४ जखमी
फोटो गॅलरी