scorecardresearch

धक्कादायक! नागपूरमध्ये चॉकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा; चॉकलेट देणाऱ्या आरोपीचा शोध सुरु

चॉकलेट देण्यामागे नेमका त्या व्यक्तीचा नेमका काय हेतू होता याचा शोध बर्डी पोलीस घेत आहेत.

धक्कादायक! नागपूरमध्ये चॉकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा; चॉकलेट देणाऱ्या आरोपीचा शोध सुरु
नागपूरमध्ये चॉकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूरमधील बर्डी येथील मदन गोपाल हायस्कूलमध्ये अनोळखी व्यक्तीने दिलेले चाॅकलेट खाल्ल्याने १७ मुलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या मुलांना बर्डी येथीलच लता मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. चाॅकलेट वाटणारी व्यक्ती नेमकी कोण होती याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

हेही वाचा- अमरावती: बेपत्‍ता उच्चशिक्षित युवतीचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह

मिळालेल्या माहितीनुसार एका अनोळखी व्यक्तीने शाळेच्या बाहेर मुलांना चाॅकलेट वाटले. चॉकलेट खालल्यानंतर मुलांना त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात मुलांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून सगळ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. हर्ष देशमुख यांनी दिली. चाॅकलेट वाटणारी व्यक्ती नेमकी कोण होती? याचा शोध सुरु असून हे चॉकलेट वाढदिवस म्हणून वाटले की काही वेगळा हेतू होता या सर्व बाबी तपासानंतर उघड होईल अशी माहिती बर्डी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही टिव्हीत काही माहिती मिळणार काय? याचाही शोध पोलीस घेत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 16:50 IST

संबंधित बातम्या