नागपूर : कोराडीतील प्रस्तावित विद्युत प्रकल्पासंदर्भातील जनसुनावणी अवघ्या काही तासांवर आली असताना १७ वर्षीय यामिनीने प्रदूषणाविरोधात तयार केलेला व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राज्यातील सहा ठिकाणचे वीज युनिट बंद करून कोराडी येथे ६६० मेगावॅटचे दोन युनिट नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे प्रस्तावित आहे. याकरिता पर्यावरण मूल्यांकन करण्यात आले असून वीजप्रकल्पाला अडथळा ठरणाऱ्या अनेक गोष्टी त्यातून वगळण्यात आल्या आहेत. त्यावर सोमवारी भर दुपारी बारा वाजता जनसुनावणी कोराडी येथे आयोजित करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडीओ हेही वाचा - नागपूर: तर सत्तेत येण्याचा महाविकास आघाडीचा मार्ग थांबणार सुद्धा आहे – कडू या प्रकल्पसोबतच जनसुनावणीला पर्यावरणवाद्यांनी सुरुवातीपासून कडाडून विरोध केला. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयापर्यंत तक्रार नोंदवूनही काहीच होत नसल्याने ही मोहीम आता आणखी तीव्र करण्यात आली आहे. यातच आता १७ वर्षीय यामिनी बोरकरने तयार केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात तिने कोराडीतील आधीच्याच वीज प्रकल्पामुळे होत असलेली पर्यावरणाची नासाडी, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम आणि शेतीवर होणाऱ्या परिणामांचा झालेला पाढा वाचला आहे. तर प्रस्तावित वीज प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान तिने या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आणले आहेत.