scorecardresearch

अपहरण केलेल्या मुलीला परत सोडायला आला अन्…! जमावाकडून अपहरणकर्त्याची हत्या

हत्या झालेल्या व्यक्तीवर १२ गुन्हे दाखल आहेत. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.

अपहरण केलेल्या मुलीला परत सोडायला आला अन्…! जमावाकडून अपहरणकर्त्याची हत्या
प्रातिनिधिक छायाचित्र

अमरावतीतूल चांदूर रेल्वे येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला परत घरी सोडून देणाऱ्या अपहरणकर्त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी जुन्या वादातून अपहरणकर्त्याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा- अमरावती : पालकमंत्र्यांना ‘स्‍पायडर मॅन’ सारखे फिरावे लागणार ; नाना पटोले यांची टीका

जुन्या वादातून हत्या

चांदूर रेल्वे शहरातील शिवाजीनगर झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नईम खान रहेमान खान (३८) याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला घरी सोडले होते. त्यानंतर हातात तलवार घेऊन परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करुन चिथावणी दिली. तसेच त्या परिसरातील व्यक्तींसोबत त्याचा जुना वाद होता, याच कारणातून चौघांनी गुरुवारी मध्यरात्री त्याच्यावर हल्ला चढवून हत्या केल्याचे समोर आले आहे. नईमविरुध्द आजवर हत्येसह एकूण १२ गुन्हे दाखल होते.

हेही वाचा- ‘रिफायनरी’बाबत साशंकता; उद्योजक आग्रही तर पर्यावरणवादी विरोधात

नयीमवर १२ गुन्हे दाखल

मोहम्मद आशिक अब्दुल कादर (४२), साजिद उमर ऊर्फ पप्पू फारुख शेख (४१), अफझल खान युसूफ खान (२७) आणि दीपक रतन पवार (२८), रा. चांदूर रेल्वे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नईम खान विरुध्द हत्या, प्राणघातक हल्ला करणे, मारहाण करणे असे शरीराविरुध्दचे सहा, दारू प्रतिबंधक कायद्यान्वये तीन, अपहरणाचे दोन तर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एक असे १२ गुन्हे दाखल होते. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला तडीपार सुध्दा करण्यात आले होते. तो परिसरातही गुंडगिरी करत असल्यामुळे या मारेकऱ्यांपैकी एकासोबत त्याचा पूर्वी वाद झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. गुरुवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास नईम, त्याचे दोन मित्र व अपहृत मुलगी हे एकाच दुचाकीने मुलीच्या घराजवळ पोहचले. त्यानंतर मुलगी तीच्या घरात गेली व नईम स्वत:च्या घरात गेला. त्यानंतर तो तलवार घेऊन बाहेर आला होता.

हेही वाचा- आश्रम शाळेतील १२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमध्ये कोंबले; श्वास गुदमरल्याने प्रकृती खालावली

चौघांना अटक

बुधवारी दुपारी मुलीचे अपहरण केल्यानंतर नईम कुठे घेऊन गेला. तसेच इतरही माहिती घेण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मुलीची विचारपूस केली. मात्र त्याने कुठे नेले, त्या गावाचे, ठिकाणांचे नाव आपल्याला माहिती नसल्याचे या मुलीने सांगितले. दरम्यान, नईमच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-09-2022 at 16:15 IST

संबंधित बातम्या