scorecardresearch

पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात करोनाची दहशत; स्वयंपाक करणाऱ्यांपासून डॉक्टरांपर्यंत सगळ्यांना….

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते समृद्धी महामार्ग, नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यात करोनाची दहशत; स्वयंपाक करणाऱ्यांपासून डॉक्टरांपर्यंत सगळ्यांना….
पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांना करोना विषाणूच्या संक्रमणापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सुमारे २ हजार अधिकारी- कर्मचाऱ्यांची करोना चाचणी केली जाणार आहे.

हेही वाचा- ‘सत्ता गेल्यामुळे त्यांना… ‘; भाजपा महाराष्ट्र तोडत असल्याच्या आरोपावरुन अब्दुल सत्तारांचा नाना पटोलेंना टोला

शुक्रवारी नागपुरातील पोलीस रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात अधिकारी- कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या नागपूर आगमनादरम्यान विमानतळावर उपस्थित राहणारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांसह इतरही अधिकारी- कर्मचाऱ्यांची चाचणी होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले. राजभवनात नियुक्त स्वयंपाकी, पथकातील डॉक्टरांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचीही चाचणी होणार आहे. ज्यांची चाचणी झाली त्यांचा अहवाल शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदा होणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात, “आम्ही याबाबत…”!

पंतप्रधानांशी संबंधित विषय असल्याने करोना चाचणीबाबत अद्याप काही माहिती देता येत नाही. परंतु वरिष्ठांच्या सूचनेनुसार नमुने घेतले जात आहेत, अशी माहिती नागपूर महापालकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 17:27 IST

संबंधित बातम्या