भ्रमणध्वनीसाठी रागावल्याने तरुणीची आत्महत्या

नागपूर : मोबाईल वापरावरून वडील रागवल्याने एका २० वर्षीय युवतीने आत्महत्या केली. राणी विजय वाघमारे असे या मृत युवतीचे नाव आहे. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडार मोहल्ला परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राणीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ती मोबाईलचा अतिवापर करीत असे. यावरून तिच्या पालकांनी तिला अनेकदा हटकले होते. मंगळवारी […]

नागपूर : मोबाईल वापरावरून वडील रागवल्याने एका २० वर्षीय युवतीने आत्महत्या केली. राणी विजय वाघमारे असे या मृत युवतीचे नाव आहे. ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडार मोहल्ला परिसरात बुधवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

राणीचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. ती मोबाईलचा अतिवापर करीत असे. यावरून तिच्या पालकांनी तिला अनेकदा हटकले होते. मंगळवारी रात्री तिचे वडील हिरामण वाघमारे यांनी तिला मोबाईलच्या अतिवापरावरून परत एकदा हटकले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास सगळेजण झोपी गेले.

पहाटे चारच्या सुमारास हिरामण उठले असताना राणीने स्वयंपाकघरात गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 20 year old girl committed suicide after her father got angry over her mobile phone use zws

ताज्या बातम्या