scorecardresearch

तीन वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २११ मृत्युमुखी; नुकसानभरपाईपोटी वन खात्याकडून २०९.३६ कोटी

राज्यातील सर्वाधिक जंगल विदर्भात आहे आणि गेल्या काही वर्षांत वाघ, बिबटय़ासोबतच इतरही वन्यप्राण्यांचे माणसांवरील हल्ले वाढले आहेत.

नुकसानभरपाईपोटी वन खात्याकडून २०९.३६ कोटी

नागपूर : मानव-वन्यजीव संघर्ष राज्यात वाढत असताना त्यावर नियंत्रण ठेवण्यात वनखात्याला अजूनही यश आलेले नाही. या संघर्षांवर पर्याय शोधण्याऐवजी त्यातून होणाऱ्या नुकसान भरपाईतच वनखाते पैसे खर्च करीत आहे. मागील तीन वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्य आणि पशुधन हानीवर नुकसानभरपाई पोटी खात्याने तब्बल २०९.३६ कोटी रुपये खर्च केले आहेत. माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.

राज्यातील सर्वाधिक जंगल विदर्भात आहे आणि गेल्या काही वर्षांत वाघ, बिबटय़ासोबतच इतरही वन्यप्राण्यांचे माणसांवरील हल्ले वाढले आहेत. तृणभक्षी प्राण्यांमुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे आणि त्यांच्या मागोमाग येणाऱ्या वाघ बिबटय़ामुळे शेतकऱ्यांना शेतात पाय ठेवणे कठीण झाले आहे. त्याचा उलट परिणाम म्हणून गावकरी आणि शेतकरी वीजप्रवाह सोडून, वीषप्रयोग करून वन्यप्राण्यांना मारायला लागले आहेत. तरीही गावकऱ्यांचे मृत्यू होतच आहेत. मागील तीन वर्षांत २११ नागरिक  या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत.  माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, २०१९ साली ४७ , २०२० साली ८० तर २०२१ साली ८४ नागरिक मृत्यूमुखी पडले.  २०१९-२० या वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४१२, २०२०-२१ मध्ये ४०० तर डिसेंबर २०२१ पासून आतापर्यंत ६७ नागरिक वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाले. याच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पहिल्या वर्षांत नऊ हजार २५८ जनावरे मृत तर ९३ जखमी, दुसऱ्या वर्षांत नऊ हजार १३९ जनावरे मृत तर १५५ जखमी आणि तिसऱ्या वर्षांत तीन हजार २१३ जानवरे मृत तर ३३ जखमी झाले. पहिल्या वर्षांत नुकसान भरपाई पोटी ७० कोटी रुपये, दुसऱ्या वर्षांत ८० कोटी रुपये तर तिसऱ्या वर्षांत ५९.३६ कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली. २०१९ साली झुंजीमध्ये एका वाघ व १६ बिबट, २०२० मध्ये पाच वाघ व १७ बिबट तर २०२१ मध्ये सहा  वाघ व २१ बिबट राज्याने गमावले.

ल्लमागील तीन वर्षांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्य आणि पशुधन हानीवर नुकसानभरपाई पोटी खात्याने तब्बल २०९.३६ कोटी रुपये खर्च केले आहेत.

ल्लमाहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. राज्यातील सर्वाधिक जंगल विदर्भात आहे आणि गेल्या काही वर्षांत वाघ, बिबटय़ासोबतच इतरही वन्यप्राण्यांचे माणसांवरील हल्ले वाढले आहेत. तृणभक्षी प्राण्यांमुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 211 deaths in wildlife attacks in three years akp

ताज्या बातम्या