वर्धा : ‘लम्पी’ चर्मरोगाच्या साथीने जिल्ह्यात थैमान घातले असून गेल्या एका आठवड्यात तब्बल २७ जनावरांचा ‘लम्पी’मुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कनिष्ठ अधिकारी याचे खापर मुख्यालयी न राहणाऱ्या वरिष्ठांवर फोडत असून पशुपालक अधिकाऱ्यांच्या बेपर्वा वृत्तीने बेजार झाले आहेत.

हेही वाचा >>> वाशीम : ठराविक महिलेबाबत बोलल्यामुळेच महाविकास आघाडीकडून आगपाखड; चित्रा वाघ यांची टीका

vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
father and son drown in dhom dam in wai
सातारा: धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता पुत्राचा मृत्यू

‘लम्पी’ची साथ सर्व आठही तालुक्यात पसरली असली तरी आर्वी, आष्टी व कारंजा हे तीन तालुके सर्वाधिक प्रभावित आहेत. एकट्या आष्टी तालुक्यात ३८ जनावरे दगावली. प्रशासनातील बेपर्वा वृत्ती यास कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. वस्तुस्थितीची माहिती न दिल्याने जिल्ह्यातील सहा पशुवैद्यकीय अधिकारी बुलडाणा येथे पाठविण्यात आले. पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नागपुरातून ये-जा करीत असल्याने सर्व कारभार कनिष्ठांच्या हवाली आहे. आष्टीसाठी जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिलेले वाहन मुख्यालयाच्या सेवेत ठेवण्यात आले. तालुका अधिकारी वरिष्ठांचा दाखला देतात. पशुवैद्यकीय अधिकारी गंभीर नसल्याच्या पशुपालक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. लगतच्या अमरावती नागपूर जिल्ह्यातून येथे प्रसार होत आहे. फारच गंभीर स्थिती तुलनेने नाही. अधिकारी कमी हे खरे असले तरी काळजी घेतल्या जात आहे. इतर आरोप व्यर्थ असल्याचे उपायुक्त डॉ. वासनिक यांनी म्हटले आहे.