चंद्रपूर : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात २७ विद्यार्थिनी अनधिकृतपणे वास्तव्याला होत्या, अशी धक्कादायक बाब वसतिगृह समितीच्या छाप्यात उघडकीस आली. विशेष म्हणजे, वसतिगृहाची जबाबदारी असलेल्या प्राध्यापिका या भाडेकरू विद्यार्थिनींकडून १२ ते १४ हजार रुपये प्रतिमाह भाडे स्वत:च स्वीकारत होत्या. दोन प्राध्यापिकांनी मिळून विद्यार्थिनींकडून आतापर्यंत २ लाख ८८ हजार भाडे वसूल केले.

चंद्रपूर-बल्लारपूर बायपास मार्गावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात १५० विद्यार्थिनींचे स्वतंत्र वसतिगृह आहे. या वसतिगृहात महाविद्यालयातील विद्यार्थिनी वास्तव्याला आहेत. प्रा. रेखा सहारे व सहायक प्राध्यापिका श्रीमती खोब्रागडे या दोघींवर वसतिगृहाची जबाबदारी आहे. १५० विद्यार्थिनींची क्षमता असताना या वसतिगृहात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थिनी वास्तव्याला असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी वसतिगृह समितीचे अध्यक्ष डॉ. ललीत ढोले, सचिव प्रा. शिशीर पाटील, प्रा. जामुनकर, प्रा. भोवरे व प्रा. मोरे या पाच जणांच्या समितीने रात्री अचानक वसतिगृहात छापा मारला. संपूर्ण वसतिगृहाची तपासणी केली असता अधिकच्या २७ विद्यार्थिनी येथे वास्तव्याला असल्याचे उघडकीस आले. या सर्व २७ विद्यार्थिनींचा जबाब व तक्रारी समितीने नोंदविल्या. या सर्व विद्यार्थिनींनी प्रा. सहारे व प्रा. खोब्रागडे यांना १२  ते १४ हजार रुपये भाडे देत असल्याची कबुली दिली.

Shivajinagar, teacher, Umarkhed taluka,
यवतमाळ : नोकरीचा तिसराच दिवस अन काळाने साधला डाव…
Jayshree Chandrikapure Vishal Kumar Nikose arrested in Gadchiroli plot scam
गडचिरोलीत पुन्हा कोट्यवधींचा भूखंड घोटाळा; बहीण- भावाला अटक, बनावट संमतीपत्राआधारे…
Chandrapur, World Book of Records, Mayesha Jain, three-month-old, intelligence, World Book of Records, animals, birds, world record, Saloni Jain, brilliant intelligence, videotape, London, certificate, medal, youngest children, extraordinary intelligence, Jain community, Chandrapur news, marathi news, loksatta news,
चंद्रपूर: अवघ्या तीन महिन्यांच्या मायशा जैनची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, जाणून घ्या काय आहे विशेष…
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
maharashtra navnirman kamgaar Sena,
मनसे कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर भरदुपारी गोळीबार, चंद्रपूरच्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधील घटना; जखमी अवस्थेत…
Petrol bomb blast and firing in Ballarpur
चंद्रपूर : पेट्रोल बॉम्बचा स्फोट आणि गोळीबाराने बल्लारपूर हादरले
Due to the allegations the donated 40 acres of land was demanded back
वर्धा : दानदाता व्यथित; आरोप झाल्याने दान दिलेली ४० एकर जमीन परत मागितली…
medical colleges, maharashtra,
राज्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी! जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात होणार

हेही वाचा >>>प्रियकराने दगा दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

प्रा.सहारे व प्रा.खोब्रागडे यांनी आतापर्यंत विद्यार्थिनींकडून अवैधपणे २ लाख ८८ हजार रुपये वसूल केल्याचे समितीच्या पाहणीत आढळून आले. मागील दोन वर्षांपासून हा प्रकार वसतिगृहात सुरू होता, अशी माहिती वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या एका विद्यार्थिनीने ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या दोन्ही प्राध्यापिकांविरुद्ध शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत वाशीमकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

भाडेवसुलीसाठी पाच महिला बाऊंसर

प्राध्यापिकांनी वसतिगृहात अनधिकृपणे वास्तव्याला असलेल्या या मुलींकडून भाडे वसुलीसाठी पाच महिला बाऊंसरची नियुक्ती केली होती. या सर्व बाऊंसरदेखील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीच आहेत. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या दोन्ही प्राध्यापिकांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी प्राचार्य डॉ. वाशीमकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. प्रशांत वाशीमकर यांच्याशी संपर्क साधला असता, मागील शैक्षणिक वर्षात ही घटना घडली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. वरिष्ठ कार्यालयाला याबाबतची माहिती दिली आहे, असे सांगितले.

हेही वाचा >>>पोलीस पाटलांंच्या भरतीचा गैरव्यवहार पोहोचला काेर्टात….कमी गुण घेणाऱ्यांना मौखिक परीक्षेत….

मेसमध्येही घोटाळा

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी मेस आहे. तिथे जवळपास २५० मुली रोज जेवण करतात, यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीकडून १७५० रुपये शुल्क आकारले जाते. तिथेही अशाच प्रकारचा घोळ झालेला आहे. हा घोटाळा जवळपास ५० लाखांच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाची देखील चौकशी सुरू आहे.