scorecardresearch

नागपूर: रेल्वेच्या जागेवरील २७ दुकाने जमीनदोस्त

पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारे शंभरहून अधिक जुना आणि जीर्ण झालेला अजनी रेल्वे पूल तोडण्यात येणार असून त्याऐवजी उड्डाण पूल उभारण्यात येत आहे.

railway premises demolished
रेल्वेच्या जागेवरील २७ दुकाने जमीनदोस्त

पूर्व आणि पश्चिम नागपूरला जोडणारे शंभरहून अधिक जुना आणि जीर्ण झालेला अजनी रेल्वे पूल तोडण्यात येणार असून त्याऐवजी उड्डाण पूल उभारण्यात येत आहे. त्यासाठी रेल्वेच्या जागेवरील आणि पुलाच्या शेजारी असलेल्या २७ दुकानांवर बुधवारी बुलडोजर चालवून जमीनदोस्त करण्यात आले.

मध्य रेल्वेने रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस यांच्या मोठा फौजफाटा लावून २७ दुकानांविरुद्धची मोहीम फत्ते केली. यातील अनेक दुकाने २५ ते ३० वर्षांहून अधिक जुने असल्याचा दावा काही दुकानदारांनी केला. तर रेल्वेने आपल्या जमिनीवरील ही दुकाने काढून टाकण्याची नोटीस दुकानदारांना बजावली होती. परंतु, त्यांनी स्वत:हून दुकाने काढली नाही. त्यामुळे अखेर आज रेल्वेने दुकाने तोडण्याची कारवाई केली, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नागपूर : नवनवीन जिवाणू-विषाणूंवर उपराजधानीत अभ्यास, बिल गेट्स फाऊंडेशनकडून ‘सिम्स’ची निवड

अजनी रेल्वे पूल जर्जर झाले आहे. शिवाय या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढलेली आहे. येथे रेल्वे उड्डाण पूल बांधण्याचे नियोजन आहे. हा पूल नागपूर महापालिकेचा आहे. महापालिकेची क्षमता नसल्याने महाराष्ट्र सरकार हे पूल बांधणार आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलमेंट महामंडळ लि. (महारेल) यांच्याकडे हे पूल उभारण्याची जबाबदारी आहे. यापूर्वी महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्यापैकी कोणी बांधायचा असा प्रश्न समोर आला होता. महापालिकेची पूल असला तरी क्षमता नसल्याने नासुप्रने बांधावा असा प्रस्ताव होता. परंतु, ते होऊ शकले नाही. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अजनी येथे इंटर मॉडेल स्टेशन उभारण्याची संकल्पना मांडली. त्याअंतर्गत सहा पदरी उड्डाण उभारण्याचा प्रस्ताव होता. परंतु, तो प्रकल्प रखडला आणि पुलाचे काम होऊ शकले नाही.

हेही वाचा >>>नागपूर: नागरिकांच्या जीवांशी खेळ?, रेशीमबाग मैदानात झुल्यांचे संचालन चक्क लहान मुलांकडे

दरम्यान, दिवसेंदिवस पुलाची स्थिती जर्जर होत आहे आणि सोबतच त्यावरील वाहतूक वाढत आहे. यामुळे पूल कोसळण्याचा धोका आहेच. शिवाय दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पण आता महापालिकेच्या या पुलाच्या खर्चाची जबाबदारी उचलण्यास राज्य सरकार तयार झाले. यासंदर्भात आमदार विकास ठाकरे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्य सरकारने हा पूल राज्य सरकार बांधणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले होते.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 10:36 IST