scorecardresearch

Premium

अबब! ७ ग्रॅमला ३२ हजार रुपये, सोन्याएवढ्या महाग ‘मॅफेड्रॉन’ मादक पदार्थाची तस्करी

अत्यंत महागडे मॅफेड्रॉन म्हणजेच एमडी या पदार्थाची नागपुरातून हिंगणघाटमार्गे वर्ध्यात होणारी तस्करी उघडकीस आली आहे.

drug trafficking
पोलिसांनी पावडर, रोख, कारसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. (फोटो- प्रातिनिधिक)

लोकसत्ता टीम

वर्धा : अमली पदार्थाच्या दुनियेत अत्यंत महागडे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॅफेड्रॉन म्हणजेच एमडी या पदार्थाची नागपुरातून हिंगणघाटमार्गे वर्ध्यात होणारी तस्करी उघडकीस आली आहे.

ganja seized on Samriddhi highway near Mehkar
अंमली पदार्थांच्या तस्करीचीही ‘समृद्धी’! मेहकरनजीक समृद्धी महामार्गावर ४३ किलो गांजा जप्त
pune recorded high decibel sound during ganesh immersion procession
पुणे: विसर्जन मार्गावर दणदणाट…स्पीकर, ढोल ताशांचा आवाज मर्यादेबाहेर
Central railway, railway project, Kalyan, kasara
विश्लेषण : कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गिकेची प्रतीक्षा केव्हा पूर्ण होणार?
Kharpada and Kashedi
गणेश उत्सव २०२३ : कोकणात खारपाडा ते कशेडी मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची जय्यत तयारी, प्रत्येक पाच किलोमीटरवर…

आणखी वाचा-‘स्क्रब टायफस’चा धोका वाढला, यवतमाळमध्ये १० रुग्ण…

आरोपी सचिन मिशरकर हा नागपुरातून एमडी या मादक पदार्थाची वाहतूक करीत असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हिंगणघाट येथील मनसे चौकात फिल्डिंग लावली. त्यावेळी भरधाव वेगात येणारी पांढऱ्या रंगाची कार दिसली. थांबवून झडती घेतल्यावर एका प्लास्टिक डबीत ७ ग्रॅम ८७० मिग्रॅ एमडी पावडर आढळून आली. त्याची अंदाजित किंमत ३१ हजार ५०० रुपये आहे. पोलिसांनी पावडर, रोख, कारसह पाच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. यापूर्वी देखील असे अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई झाली असल्याने हे शहर मादक पदार्थ विक्रीचा अड्डा होत चालल्याची चर्चा होते. पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या चमूने ही कारवाई केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 32000 rupees for 7 grams drug trafficking mephedrone expensive as gold pmd 64 mrj

First published on: 22-09-2023 at 11:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×