छत्तीसगड मधील रायगड-झारसुगुडा विभागातील चौथ्या रेल्वे मार्गाच्या विद्युत जोडणीच्या कामामुळे रेल्वे प्रशासनाने २१ ते ३१ ऑगस्टदरम्यान मुंबई, पूणे, हावडासाठी नागपूरमार्गे धावणार्‍या ३४ रेल्वेगाड्या दहा दिवसांसाठी रद्द केल्या आहेत.

हेही वाचा – भंडारा : पहिल्याच पावसात बंधारा गेला वाहून ; शासनाचा लाखोंचा निधी पाण्यात

यामध्ये हावडा-पूणे एक्सप्रेस (२१ ते २८ ऑगस्ट), पूणे- हावडा एक्सप्रेस (२१ ते २८ ऑगस्ट, टाटानगर-इतवारी एक्सप्रेस (२१ ते २८ ऑगस्ट), इतवारी-टाटानगर एक्सप्रेस (२१ ते २८ ऑगस्ट),, हावडा-मुंबई सीएसएमटी (२१ ते २८ ऑगस्ट), ऑगस्ट, मुंबई सीएसएमटी- हावडा मेल (२१ ते २८ ऑगस्ट), हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस (२१ ते २८ ऑगस्ट), अहमदाबाद – हावडा एक्सप्रेस (२१ ते २८ ऑगस्ट), शालिमार-एलटीटी एक्सप्रेस (२१ ते २८ ऑगस्ट), एलटीटी- शालिमार एक्सप्रेस (२१ ते २८ ऑगस्ट), गोंदिया-झारसुगुडा विशेष (२१ ते २८ ऑगस्ट), झारसुगुडा -गोंदिया स्पेशल ( २२ ते २९ ऑगस्ट), हावडा-मुंबई सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस (२२,२३,२४ व २६ ऑगस्ट) रोजी धावणार नाही.

हेही वाचा – नागपूर : बेरोजगार म्हटल्याने प्रियकर दुखावला, रागाच्या भरात प्रेयसीचा गळा चिरला

मुंबई सीएसएमटी- हावडा दुरांतो एक्सप्रेस २३,२४,२५ आणि २८ ऑगस्ट रोजी धावणार नाही. हावडा-पुणे दुरांतो एक्सप्रेस २० ते २५ आणि २७ ऑगस्टला धावणार नाही. पुणे- हावडा दुरांतो एक्सप्रेस २२, २७ ऑगस्ट आणि २९ ऑगस्टला धावणार नाही. हटिया-पुणे एक्सप्रेस २२, २६ आणि २९ ला धावणार नाही. पुणे-हटिया एक्सप्रेस २४, २८ आणि ३१ ऑगस्टला धावणार नाही. संत्रागाछी-पूणे एक्सप्रेस २० आणि २७ ऑगस्टला धावणार नाही. पूणे- संत्रागाछी एक्सप्रेस २२ आणि २९ ऑगस्टला धावणार नाही.

पोरबंदर- शालीमार एक्सप्रेस २४ आणि २५ ऑगस्टला धावणार नाही. शालीमार-पोरबंदर एक्सप्रेस २६ आणि २७ ऑगस्टला धावणार नाही. ओखा-शालिमार एक्सप्रेस २१ आणि २८ ऑगस्टला धावणार नाही. एलटीटी- शालीमार एक्सप्रेस २४ आणि २५ ऑगस्टला धावणार नाही. शालीमार – एलटीटी एक्सप्रेस २६ आणि २७ ऑगस्टला धावणार नाही. हटिया-एलटीटी एक्सप्रेस २६ आणि २७ ऑगस्टला धावणार नाही. एलटीटी-हटिया एक्सप्रेस २८ आणि २९ ऑगस्टला धावणार नाही. हजूर साहिब नांदेड – संत्रागाछी एक्सप्रेस २२ आणि २९ ऑगस्टला धावणार नाही. संत्रागाछी- हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस २४ आणि ३१ ऑगस्टला धावणार नाही. कामाख्या-एलटीटी एक्सप्रेस २० आणि २७ ऑगस्टला धावणार नाही.