चार नवीन रुग्णांची भर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत एक करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला, तर चार नवीन रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात तब्बल ४२ दिवसांनी दिवाळीच्या तोंडावर मृत्यू नोंदवल्या गेल्याने चिंता वाढली आहे.

दगावलेला रुग्ण हा नागपूरच्या ग्रामीण भागातील आहेत. प्रकृती खालावल्यावर त्याला रुग्णालयात दाखल केले गेले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामीण भागातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या २ हजार ६०४, शहरातील ५ हजार ८९३, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६२४ अशी एकूण १० हजार १२१ रुग्णांवर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यात १६ सप्टेंबरला एका रुग्णाचा मृत्यू नोंदवला गेला होता. त्यानंतर ४२ दिवसांनी हा मृत्यू झाला. बुधवारी शहरात १, ग्रामीणला १, जिल्ह्याबाहेरील २ असे एकूण ४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या ३ लाख ४० हजार ३५८, ग्रामीण १ लाख ४६ हजार १९२, जिल्ह्याबाहेरील ६ हजार ८८४ अशी एकूण ४ लाख ९३ हजार ४३४ रुग्णांवर पोहोचली आहे.  दिवसभऱ्यात शहरात ४, जिल्ह्याबाहेरील ३ असे एकूण ७ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार ४३३, ग्रामीण १ लाख ४३ हजार ५८४, ५ हजार २५९ अशा एकूण ४ लाख ८३ हजार २७६ व्यक्तींवर पोहोचली आहे. दरम्यान शहरात सध्या ३२, ग्रामीणला ४, जिल्ह्याबाहेरील १ असे एकूण ३७ सक्रिय करोनाग्रस्त रुग्ण आहेत.

विदर्भात  ७ नवीन रुग्ण

विदर्भात २४ तासांत  ७ नवीन रुग्णांची भर पडली.  नवीन रुग्णांमध्ये नागपुरातील ४, अमरावती १, गडचिरोली १, भंडारा १ अशा एकूण ७ रुग्णांचा समावेश आहे.  चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, वाशिम, अकोला, बुलढाणा, वर्धा या सात जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण नोंदवला गेला नाही.

ग्रामीणला केवळ  ६६५ चाचण्या

शहरात दिवसभरात २ हजार ६, ग्रामीणला ६६५ अशा एकूण २ हजार ६७१  चाचण्या झाल्या. मंगळवारी जिल्ह्यात ही संख्या  २ हजार ६३३ नोंदवली गेली होती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 42 days after death corona virus infection four new patients added akp
First published on: 28-10-2021 at 01:03 IST