नागपूर ते हावडा मार्गावरील रायगड- झारसुगुडा दरम्यान रेल्वेमार्गाचे काम (नॉन इंटरलॉकिंग) सुरू असल्याने ४२ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.दक्षिण-पूर्व-मध्ये बिलासपूर विभागातील रायगड- झारसुगुडा दरम्यान चौथ्या रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी ‘ब्लॉक’ घेतल्या जाणार आहे. त्यामुळे २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> लोकशाहीच्या मुद्द्यावर ‘बामसेफ धडकणार संघ मुख्यालयावर’ ; ६ ऑक्टोबरला मोर्चाचे आयोजन

यामध्ये हावडा-पुणे व पुणे-हावडा एक्स्प्रेस, हावडा-सीएसटीएम, शालीमार-एलटीटी, पुरी-एलटीटी, शालीमार-ओखा आदी मेल व एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. यात नागपूर विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहे.