दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने झालेल्या वादातून ४५ वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना कारंजा तालुक्यातील दोनद येथे घडली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध धनज बू. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारंजा तालुक्यातील धनज बू. पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या दोनद येथे २३ ऑक्टोंबर रोजी रात्री ११ वाजेदरम्यान घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकास किसन ढोकणे (४५) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून ते दोनद येथील रहीवासी हेाते.

हेही वाचा >>> लक्ष्मीपूजनाला मिष्ठांन्नावर ‘चटणी- भाकर’ ठरली वरचढ; शिवसेना व राष्ट्रवादीचे आंदोलन ठरले लक्षवेधी

आरोपी संतोष बबनराव भेंडेकर याने मृतक विकास ढोकणे याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता विकासने पैसे दिले नाही म्हणून आरोपी संतोष भेंडेंकर याने विकासच्या गळयावर, खांद्यावर व काखेत विळ्याने वार केले. त्यामुळे मृतक विकास गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला कुटुंबीयांनी ग्रामस्थांच्या मदतीने कांरजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपी संतोष भेंडेकर याच्या विरूध्द कलम ३०२ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड व कर्मचारी हमीद आणि जावेद भवानीवाले आरोपीचा शोध घेत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 45 year old man killed after denied money for liquor zws
First published on: 24-10-2022 at 19:42 IST