राज्यात जिल्हा व कनिष्ठ न्यायाधीशांची ५१७ पदे रिक्त!

दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्या प्रमाणात न्यायालयांमध्ये खटलेही दाखल होत आहेत.

देशभरातील न्यायालयांमध्ये असलेल्या रिक्त पदांवर चिंता व्यक्त करून सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांना काल, रविवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात अश्रू अनावर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांनी हा रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित केल्याने गतिमान न्यायदानाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात एकूण ५१७ जिल्हा व कनिष्ठ न्यायाधीशांची पदे रिक्त असल्याची माहिती आहे.
दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. त्या प्रमाणात न्यायालयांमध्ये खटलेही दाखल होत आहेत. प्रलंबित खटल्यांच्या तुलनेत न्यायाधीशांची संख्या फारच कमी आहे. शिवाय, न्यायाधीशांची रिक्त पदेही प्रचंड असल्याने या प्रलंबित खटल्यांचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. न्यायपालिकेतील प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी दिल्ली येथील विज्ञान भवनात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दोन दिवसीय परिषद घेण्यात आली. या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर उपस्थित होते. त्यावेळी न्या. ठाकूर यांनी देशातील न्यायपालिकेच्या गंभीर परिस्थतीची मांडणी केली. ही परिस्थिती निदर्शनास आणून देताना ते भावूक झाले होते. न्यायाधीशांची संख्या कमी असल्याने नागरिकांना वेळेत न्याय मिळत नाही. त्यामुळे वर्षांनुवष्रे खटले प्रलंबित राहतात. पक्षकाराने जगाचा निरोप घेतल्यानंतरही प्रकरणाचा निकाल येत नाही.न्यायपालिकेकडे सरकारचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नवीन न्यायालये आणि पदांची निर्मिती आवश्यक आहे, परंतु सरकार आहे तीच पदे भरत नसल्याची चिंताजनक बाब महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातही प्रामुख्याने जाणवते. महाराष्ट्रात एकूण ५१७ जिल्हा व कनिष्ठ न्यायाधीशांची पदे रिक्त आहेत. त्यातील सर्वाधिक ४९ रिक्त पदे मुंबईत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. या जिल्ह्य़ात न्यायाधीशांची ४२ पदे रिक्त आहेत.

जिल्हानिहाय रिक्त पदे
जिल्हा                 रिक्त पदे
मुंबई                    ४९
पुणे                      ४२
अहमदनगर         ३४
औरंगाबाद           ३१
नागपूर                २८

तालुकानिहाय रिक्त पदे
तालुका          रिक्त पदे
नागपूर            २३
कळमेश्वर           १
कामठी               १
कुही                   १
नरखेड               १
पारशिवनी         १

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 517 judges posts lying vacant in maharashtra

ताज्या बातम्या