राज्यभरातील ५२० पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांना संवर्ग न मागितल्यामुळे त्यांची पदोन्नती रखडली होती. परंतु, आता पोलीस महासंचालकांनी सकारात्मक पाऊल उचलले असून निवड झालेल्या हवालदारांची माहिती मागवण्यात आली आहे. लोकसत्ताने पदोन्नतीबाबत वृत्त मालिका प्रकाशित करून पाठपुरावा केला होता, हे विशेष.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- जगाला औषध पुरवणारे केंद्र होण्याची भारतामध्ये क्षमता; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

राज्य पोलीस विभागात कार्यरत असलेल्या २०१३ अर्हता परीक्षा उत्तीर्ण ५२० हवालदारांच्या पदोन्नतीबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने गृहमंत्रालयाकडून परवानगी घेतल्यानंतर १२ जुलैपर्यंत माहिती मागवण्यात आली होती. महासंचालक कार्यालयातून निवड केलेल्या हवालदारांची यादीही प्रकाशित केली होती. त्या सर्व हवालदारांची वैद्यकीय चाचणी आणि अन्य प्रक्रिया आटोपली होती. पोलीस महासंचालक कार्यालयातून पदोन्नतीच्या आदेशावर सही करून पदोन्नतीचा आदेश काढण्याची प्रक्रिया बाकी होती. ही प्रक्रिया रखडल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केले होते. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयात खळबळ उडाली. केवळ एका सहीसाठी पदोन्नती अडल्याचे लक्षात येताच पोलीस महासंचालकांनी हालचाली करीत सकारात्मक पाऊल उचलले. गेल्या १९ जानेवारी रोजी राज्यभरातील ५२० हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी माहिती मागविली आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांतच पदोन्नतीची यादी जाहीर होणार असल्यामुळे राज्यभरातील पोलीस हवालदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा- “…तर काँग्रेस केवळ निवडणूक पोस्टरवरच उरेल”, सुनील केदारांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना इशारा

काही पोलीस हवालदारांना वगळणार

पोलीस महासंचालकांच्या आदेशाने आस्थापना विभागातील उपसहायक अपर्णा बागून यांनी आदेश काढून २०१३ अर्हताप्राप्त ५२० पोलीस हवालदारांची माहिती मागितली आहे. निवड झालेल्या हवालदारांपैकी ज्यांच्यावर विभागीय चौकशी, गुन्हा दाखल, प्रस्तावित चौकशी आणि शिक्षा झाली आहे त्या हवालदारांना वगळण्यात येणार आहे.

हेही वाचा- सरकार कोसळण्याच्या पटोलेंच्या दाव्यावर बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आणखी २० आमदार…”

माहिती मागितल्यामुळे नवचैतन्य

गेल्या सहा महिन्यांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली होती. त्यामुळे अधिकारी पदाला लागणारी वर्दी, कॅप, शूज आणि इतर साहित्य घेऊन ठेवले होते. परंतु, पदोन्नतीस विलंब होत असल्यामुळे नाराजी होती. आता महासंचालक कार्यालयाने सकारात्मकता दाखवून पदोन्नतीसाठी माहिती मागितल्यामुळे नवचैतन्य निर्माण झाल्याची प्रतिक्रिया मुंबई आयुक्तालयातील पोलीस हवालदाराने दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 520 constables in the state will become police sub inspectors adk 83 dpj
First published on: 23-01-2023 at 09:20 IST