६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरेई ससाई व त्यांच्या भिक्खु संघाने पहिल्याच दिवशी ७ हजारांवर अनुयायांना धम्मदीक्षा दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नागपूर : विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात ‘अभाविप’चे आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर लाखो बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मुख्य सोहळ्याला देश-विदेशातील अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. या दिनाचे औचित्य साधून भदंत ससाई मागील अनेक वर्षांपासून धम्मदीक्षा देत आहेत.

आतापर्यंत लाखो बांधवांनी येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. करोना महामारीमुळे गेली दोन वर्ष दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा होऊ शकला नाही. यंदा करोनामुक्त वातावरण आणि कोणतेही प्रतिबंध नसल्यामुळे मुख्य सोहळ्यासाठी बौद्ध उपासक-उपासिका, धम्म बांधव आणि अनुयायी मोठ्या संख्येने दीक्षाभूमीवर येत आहेत. यातील बहुतांश बांधव सोहळ्यासह धम्मदीक्षा घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे भदंत ससाई यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर तीन दिवस धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतन कपातीला तात्पुरती स्थगिती ; सणासुदीचा काळ लक्षात घेऊन निर्णय

भिक्खु संघाचे भदंत धम्मसारथी, भदंत नागवंश, भदंत नागसेन, भदंत प्रज्ञा बोधी, भदंत धम्म विजय, भदंत महानाग, भदंत धम्मप्रकाश, भदंत मिलिंद, भदंत धम्मबोधी, भदंत नागाप्रकाश, भदंत महाकश्यप आदींच्या उपस्थित दीक्षा सोहळा ३ ऑक्टोबरला सकाळपासून सुरू झाला. यात दिवसभरात ७ हजारांवर अनुयायांना धम्मदीक्षा घेतली. धम्मदीक्षा दिल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रही वितरीत करण्यात आले.

हेही वाचा- नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अधिसंख्य कर्मचा-यांचे उपोषण मागे

६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा बुधवारी असला तरी विविध राज्यातून दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांनाा सुरुवात झाली आहे. धम्मदीक्षेच्या पहिल्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा स्वीकारणाऱ्यांमध्ये बहुतांशी बाहेर राज्यातील अनुयायांचा समावेश होता. कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानातून अनेक लोक कुटुंबासमवेत दीक्षाभूमीवर आले आहेत. दोन वर्षांनंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा होणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 thousand followers took initiation on the first day at diksha bhoomi during dhammadiksha ceremony nagpur dpj
First published on: 04-10-2022 at 09:37 IST