scorecardresearch

Premium

अमरावती विभागातील सिंचन प्रकल्‍पांमध्‍ये ७७.१८ टक्‍के जलसाठा

गेल्‍या काही दिवसांत सिंचन प्रकल्‍पांच्‍या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्‍याने अमरावती विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांत पाणीसाठा ७७.१८ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे.

water irrigation projects Amravati Division
अमरावती विभागातील सिंचन प्रकल्‍पांमध्‍ये ७७.१८ टक्‍के जलसाठा

अमरावती : गेल्‍या काही दिवसांत सिंचन प्रकल्‍पांच्‍या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्‍याने अमरावती विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांत पाणीसाठा ७७.१८ टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. अप्‍पर वर्धा धरण १०० टक्‍के भरले असून या धरणाच्‍या तीन दरवाजांमधून १२२ घनमीटर प्रतिसेकंद पाणी सोडण्‍यात येत आहे.

मागील वर्षी याच कालावधीत मोठ्या प्रकल्‍पांमध्‍ये ९४ टक्के पाणीसाठा होता. यंदा मोठ्या प्रकल्‍पांपैकी अप्‍पर वर्धा, पूस, अरूणावती, वान, काटेपूर्णा हे प्रकल्‍प तुडुंब भरले आहेत, तर उरलेल्या इतर प्रकल्पांमध्येही पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे यावर्षी शेती, औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावणार नसल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.

mumbai high court, irrigation department, irai river, zarpat river
इरई, झरपट नदी खोलीकरण व सौंदर्यीकरण प्रकरणात सिंचन विभागही प्रतिवादी
chandrapur super thermal power station, fake project victim certificates, sub divisional officer investigation started
चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातील बोगस प्रकल्पग्रस्तांचे प्रकरण, उप विभागीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू
increase in lumpi akola
अकोल्यात ‘लम्पी’ प्रादुर्भावात सातत्याने वाढ; १० कि. मी. क्षेत्रामध्ये…
yavatmal
बेरोजगारांच्या पैशांतून यवतमाळ जिल्हा परिषद मालामाल; नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…

हेही वाचा – धक्कादायक! नागपुरात २.६० कोटींची सडकी सुपारी जप्त… प्रकरण काय पहा…

विभागात ९ मोठे, २७ ध्यम, तर २४५ लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील पाण्यावरच सिंचन तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. गेल्‍या वर्षीही चांगले पर्जन्‍यमान झाल्‍यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. सततच्या पावसामुळे प्रकल्पांत पाण्याची आवक होत राहिल्याने अनेक‍ प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांत प्रकल्पीय संकल्पित १३९९ दलघमी पाणीसाठ्याच्या तुलनेत ११०८ दलघमी (७९.१५ टक्के) साठा आहे. बुलडाणा जिल्हा मात्र यास अपवाद असून या जिल्ह्यातील तीनही मोठ्या प्रकल्पांतील साठा अद्याप ५० टक्केही झालेला नाही. नळगंगा प्रकल्पात २१ दलघमी (३१ टक्के), पेनटाकळीमध्ये ३० दलघमी (५० टक्के) व खडकपूर्णा प्रकल्पांत ६.९५ दलघमी (७ टक्के) साठा आहे.

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात १०० टक्के साठा झाला असून त्याच्या तीन दरवाजांमधून १२२ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे. अमरावती जिल्‍ह्यातील शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन या चार मध्यम प्रकल्प मिळून ९२ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच उरलेल्या मध्यम ज्यामध्ये पंढरी ३२.७४ टक्के, बोर्डी नाला १.८८ टक्के, तर गर्गा शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्याचसोबत ४६ लघु प्रकल्पातही ८९.९२ टक्के पाणी साठा आहे. मुबलक पाणीसाठ्यामुळे पशूंच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला.

हेही वाचा – नागपूर : कोराडी औष्णिक वीज प्रकल्प विस्तारीकरणावर उच्च न्यायालयाची केंद्र व राज्य सरकारला नोटीस

सध्या सर्व ५४ पैकी ७ प्रकल्पांत ६९.८० टक्क्यांपेक्षा अधिक तर ४६ लघु प्रकल्पांत ८९.९२ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा आहे. या एकूण प्रकल्पांत ८८८.७८ दलघमी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये ८३.२१ इतका जलसाठा होता. विभागातील २७ मध्यम प्रकल्पांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव अकोला जिल्ह्यातील उमा, वाशीम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पांत शंभर टक्के साठा झाला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 77 percent water storage in irrigation projects in amravati division mma 73 ssb

First published on: 21-09-2023 at 09:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×