बुलढाणा: तालुक्यातील इरला शिवारात गोठ्याला आग लागून ८ जनावरे होरपळून मृत्यूमुखी पडली तर २ जनावरे भाजली असून इतर शेतीउपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे. यात शेतकऱ्याचे तब्बल साडेनऊ लाखांचे नुकसान झाले आहे.इरला येथील शेतकरी भागवत नारयन सरोदे यांची इरला शिवारातील गट नंबर १४४ मध्ये सामायिक शेती आहे. त्या ठिकाणी त्यांचा गोठा आहे. २७ मार्चला रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या गोठ्याला आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. यात ४ लाख १३ हजाराची जनावरे व ५ लाख ३५ हजाराचे इतर साहित्य मिळून एकूण ९ लाख ४८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामा अहवालात नमूद करण्यात आले आहे.

“करायला गेले काय अन् उलटे झाले पाय”, अकोल्यात हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या चौघांवर गुन्हा दाखल