बुलढाणा : आगीत ८ जनावरांचा कोळसा; कृषी साहित्य भस्मसात

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी  पंचनामा केला.

8 animals died after cowshed caught fire
इरला शिवारात गोठ्याला आग लागून ८ जनावरे होरपळून मृत्यूमुखी पडली

बुलढाणा:  तालुक्यातील इरला शिवारात गोठ्याला आग लागून ८ जनावरे होरपळून मृत्यूमुखी पडली तर २ जनावरे भाजली असून  इतर शेतीउपयोगी साहित्य जाळून खाक झाले आहे. यात शेतकऱ्याचे तब्बल साडेनऊ लाखांचे नुकसान झाले आहे.इरला येथील शेतकरी भागवत नारयन सरोदे यांची इरला शिवारातील गट नंबर १४४ मध्ये सामायिक शेती आहे. त्या ठिकाणी त्यांचा गोठा आहे.  २७ मार्चला रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांच्या गोठ्याला आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी  पंचनामा केला. यात ४ लाख १३ हजाराची जनावरे व ५ लाख ३५ हजाराचे इतर साहित्य मिळून एकूण ९ लाख ४८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामा अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 21:55 IST
Next Story
श्रीराम जन्मोत्सव ‘हायजॅक’ ; कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह
Exit mobile version