नागपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाचे संक्रमण वाढत असून २४ तासांत जिल्ह्यात ८० नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ४५९ वर पोहचली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात दिवसभरात १ हजार ५८९ तर ग्रामीणमध्ये ५२७ अशा एकूण २ हजार ११६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात शहरातील ६१ जणांना तर ग्रामीण भागातील १९ अशा एकूण ८० जणांना करोनाचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांची संख्या बघता शहरात सकारात्मक अहवालाचे प्रमाण ३.८३ टक्के, ग्रामीण भागात ३.६० टक्के असे एकूण जिल्ह्यात ३.७८ टक्के नोंदवण्यात आले. हे प्रमाण अधिक असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

दरम्यान दिवसभरात शहरात ४६, ग्रामीणला १९ असे एकूण ६५ रुग्ण करोनामुक्त झाले. सक्रिय रुग्णांची एकूण संख्या ४५९ नोंदवली गेली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 80 corona victims in nagpur the number active patients is 459 amy
First published on: 01-07-2022 at 16:42 IST