बुलढाणा: अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (डीआयजी)यांच्या पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नजीकच्या वरवट मार्गावरील गौरव हॉटेल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यात ८१ आरोपींना जुगार खेळताना पकडले असून रोख ७ लाख व जुगार साहित्य, १३ चारचाकी गाड्या, ५९ मोटरसायकली, १८१ मोबाईल, असा एकूण २ कोटी ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कार्यवाही मानली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरखिलकर (आयपीएस) ,नेर येथील पोलीस निरीक्षक जाधव,यांचे नेतृत्वात करण्यात आली. आज उत्तररात्री अडीच वाजे पर्यंत ही कारवाई सुरू होती. अमरावती येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांना मिळालेल्या माहितीवरून शनिवारी रात्री हॉटेल गौरव बार अँड रेस्टोरंटवर यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य निरखिलकर यांच्या नेतृत्वात धड टाकण्यात आली. हेही वाचा >>> दुर्दैवी! नाकाला चिमटा लावला अन् चिमुकलीचा गुदमरून जीव गेला या कारवाईत आरोपी, ७ लाख रोख, ५९मोटारसायकल आणि १८१ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत् २कोटी ७० लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कारवाई करण्यापूर्वी पथक मधील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी शेगावमध्ये येऊन हॉटेलमधील जुगाराची 'रेकी' केली. त्यानंतर याच हॉटेलमध्ये दुपारी जेवण हि केले. त्यानंतर सापळा रचला व अमरावती येथून हिरवी झेंडी मिळताच ही मोठी रेड केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.