नागपूर : राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर मागील साडेतीन वर्षांत झालेल्या एकूण अपघातात दगावणाऱ्या नागरिकांमध्ये ८७ टक्के महिला आहेत. माहितीच्या अधिकारातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक), मुंबई कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान राज्यात एकूण १४ हजार १७० अपघात झाले. त्यात ११ हजार ८९८ नागरिक जखमी तर ७ हजार २२९ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंमध्ये ६ हजार ३२६ महिलांचा समावेश आहे. माहितीच्या अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलाकर यांनी हा तपशील पुढे आणला आहे. महिलांच्या एकूण मृत्यूमध्ये २०२१ मध्ये १ हजार ३६८, २०२२ मध्ये १ हजार ६३२, २०२३ मध्ये १ हजार ८६७ तर जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान १ हजार ४५९ महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
1.5 thousand people committed suicide in Vasai Bhayander in 5 years
५ वर्षात वसई, भाईंदर मध्ये दिड हजार जणांच्या आत्महत्या;२०२४ मध्ये गळाफास घेऊन सर्वाधिक आत्महत्या
Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
Taloja MIDC road accident
Video : तळोजातील अपघातामध्ये एक ठार, महिला अत्यवस्थ
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
woman doctor riding bike dies in truck collision accident on katraj handewadi road
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर महिलेचा मृत्यू ; कात्रज- हांडेवाडी रस्त्यावर अपघात

हेही वाचा…सोन्याच्या दरात २४ तासात घसरण… हे आहे आजचे दर…

१८ वर्षांखालील १,२२९ जणांचा मृत्यू

राज्यात २०२१ ते २०२३ दरम्यान रस्ते अपघात दगावणाऱ्यांमध्ये १८ वर्षांखालील १ हजार २२९ जणांचा समावेश आहे. २०२१ मध्ये ३७३ मृत्यू, २०२२ मध्ये ४५४ मृत्यू, २०२३ मध्ये ४०२ मृत्यूंचा समावेश आहे.

रस्ते अपघातातील सर्वाधिक मृत्यू राष्ट्रीय महामार्गावर

राज्यात राष्ट्रीय महामार्गांवर २०२१ मध्ये ७ हजार ५०१ अपघातात ४ हजार ८० मृत्यू झाले. राज्य महामार्गावर ६ हजार ३२८ अपघातात ३ हजार ४११ लोकांचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये राष्ट्रीय महामार्गावर ९ हजार ४१७ अपघातात ४ हजार ९२३ लोकांचा मृत्यू झाला. तर राज्य महामार्गावर ४ हजार ८२२ अपघातात २ हजार ५४८ मृत्यू झाले. २०२३ मध्ये राष्ट्रीय महामार्गावर १० हजार ८८१ अपघातात ५ हजार ७८० मृत्यू झाले. राज्य महामार्गावर ४ हजार ८२२ अपघातात २ हजार ५४८ मृत्यू झाले. जानेवारी २४ ते ऑक्टोबर २४ दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ९ हजार ३४८ अपघातात ४ हजार ६८१ मृत्यू झाले. याच कालावधीत राज्य महामार्गावर ४ हजार ८२२ अपघातात २ हजार ५४८ मृत्यू झाले. त्यामुळे राज्यात राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गावर अपघात व मृत्यू जास्त असल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे.

हेही वाचा…अमरावती : रेल्‍वे प्रवाशांसाठी खुषखबर ! सामान्‍य डब्‍यांच्‍या संख्‍येत वाढ

रस्ते अपघातात महिलांचे मृत्यू

वर्ष मृत्यू

२०२१ १,३६८

२०२२ १,६३२

२०२३ १,८६७

जाने. ते ऑक्टो. २४ १,४५९

एकूण ६,३२६

Story img Loader