नागपूर : केंद्र सरकारच्या सचिवालयअंतर्गत रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. ही नोकरी केंद्र सरकारी असल्याने निवड झालेल्या उमेदवारांना चांगल्या पगाराबरोबरच अनेक सोईसुविधादेखील मिळणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याठिकाणी उपक्षेत्र अधिकारी पदांच्या १२५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर आहे. अवर सचिव आणि कार्यालय प्रमुख, नॅशनल ऑथॉरिटी केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन, कॅबिनेट सचिवालय, पहिला मजला, चाणक्य भवन, चाणक्यपुरी, नवी दिल्ली या पत्त्यावर अर्ज करायचा आहे.

हेही वाचा – मर्दडी घाटात बस कोसळली, सुदैवाने…

हेही वाचा – रेल्वेच्या भुसावळ विभागाला सप्टेंबरमध्ये तब्बल १३४ कोटींचे उत्पन्न

शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून विज्ञान किंवा इतर कोणत्याही तांत्रिक किंवा वैज्ञानिक विषयातील पदव्युत्तर पदवी. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखेअगोदर सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ नोव्हेंबर आहे. अधिकृत वेबसाईट — https://cabsec.gov.in/

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 90 thousand salary job in this department of central government recruitment for many posts dag 87 ssb
First published on: 06-10-2023 at 15:22 IST