लोकसत्ता टीम

चंद्रपूर: काळ्या बिबट्याने हरणाची शिकार केल्यानंतर दुसराच बिबट्या त्या शिकारीवर ताव मारत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच सार्वत्रिक झाला आहे. ही चित्रफीत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील असल्याचा सांगितले जात असेल तरी त्याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

ताडोबा प्रकल्पात काळा बिबट्या आहे. त्या पाठोपाठ काळ्या बिबट्याची दोन पिल्ले ताडोबा प्रकल्पात मिळाली आहेत. नुकताच दोन काळ्या बिबट्याची चित्रफित सार्वत्रिक झाली होती. त्यानंतर आता काळ्या बिबट्याने हरणाची शिकार केली. त्या शिकारीवर काळा बिबट्या ताव मारत असताना तिथे एक बिबट्या येतो. त्या बिबट्याला बघून काळा बिबट्या तिथून पळून जातो. त्यानंतर त्या हरणाची केलेली शिकार हा बिबट्या सोबत घेऊन जातो. समाज माध्यमावर सध्या ही चित्रफित चांगलीच सार्वत्रिक झाली आहे.