scorecardresearch

नागपूर: क्रिकेट सट्टेबाजीने घेतला व्यापाऱ्याचा बळी, आत्महत्येपूर्वी…

क्रिकेटवर सट्टेबाजी खेळण्याच्या व्यसनातून कर्जबाजारी झालेल्या एका व्यावसायिकाने चित्रफीत तयार केली व गळफास घेऊन आत्महत्या केली.

suicied

क्रिकेटवर सट्टेबाजी खेळण्याच्या व्यसनातून कर्जबाजारी झालेल्या एका व्यावसायिकाने चित्रफीत तयार केली व गळफास घेऊन आत्महत्या केली.अमित राजेंद्र महतो (३५, नरीमन सोसायटी, गणपतीनगर) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा >>>नागपूर: पाच वर्षांत तेरा हजार टन धान्य नासाडी; अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची आकडेवारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित महतो हे दोन मुली व पत्नी शारदासह संयुक्त कुटुंबात राहत होते. त्यांचे मोठे किराणा दुकान होते. अमित यांना क्रिकेटवर सट्टेबाजी करण्याचे व्यसन लागले. सट्टेबाजीत त्यांनी लाखो रुपये उधळले. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले. गेल्या काही दिवसांपासून कर्जाची मागणी करण्यासाठी अनेक जण घरी येत होते. त्यामुळे पत्नी आणि त्यांच्यात वादही होत होते. कर्जाचा डोंगर वाढत असतानाच त्यांनीआठवड्याभरापूर्वीच पत्नीचे दागिने विक्री करून नवीन व्यापार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कर्जाची रक्कम परतफेड करण्यातच त्यांचे पैसे निघून गेले. त्यामुळे ते नैराश्यात गेले. त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>>५०० मेगावॉट संचावरून खाली पडल्याने मजुराचा मृत्यू; चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील दुर्दैवी घटना

१२ फेब्रुवारीला ते घरातून बाहेर पडले. त्यांचा मृतदेह १८ फेब्रुवारीला दुपारी आयशा लॉनजवळील शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. झाडाखाली सापडलेल्या भ्रमणध्वनीमध्ये त्यांनी एक चित्रफीत तयार केली होती. ‘मी आयुष्याला कंटाळलो आहे. मी सावरण्याचा प्रयत्न केला.परंतु, यश आले नाही. कर्जाचे ओझे सहन होत नाही. कुटुंबीयांनी मला माफ करावे.’ असे चित्रित केले होते. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 09:36 IST
ताज्या बातम्या