खामगाव येथील शासकीय विश्रामगृह परिसरातील रेल्वेगेटजवळ एक दुर्घटना घडली. काल, बुधवारी संध्याकाळी एका अज्ञात वाहनाने एका श्वानाला धडक दिली. जीव कुणाचाही असो तो माणसाचा की मुक्या जनावराचा ते प्रकरण गंभीरच. त्यासाठी कायदे आहेत. याची जाणीव करून देणारा घटनाक्रम नंतर घडला.
हेही वाचा >>>वाशीम: बंजारा ब्रिगेडने फुंकले पोहरादेवीतून राजकीय रणशिंग; रामनवमी निमित्त पोहरादेवीत उसळला जनसागर
प्रकरणी ‘पीपल्स फॉर अनिमल’ समितीच्या अध्यक्ष सुनीता आयलानी यांनी थेट खामगाव शहर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी ठाणेदारांकडे अपघाताची रीतसर तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अपघात स्थळाचा पंचनामा केला. उशिराने मृत श्वान राजाच्या मृतदेहाचे विच्छेदनही करण्यात आले. पोलिसांनी अज्ञात चालकविरुद्ध भादंवि १८६० च्या कलम ४२८ नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रामेश्वर फाटे करीत आहेत.