नागपूर : राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि नेते दिवसरात्र एक करून मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आहेत. राज्यात असे अनेक मतदारसंघ आहेत ज्यावर संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. असाच एक मतदारसंघ नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासून त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार द्यावा यासाठी महाविकास आघाडीत चिंतन मंथन सुरू होेते.

अखेर महाविकास आघाडीने कॉँग्रेसच्या प्रफुल गुडधे पाटील यांच्या नावाची घोषणा केली. या हायप्रोफाईल मतदारसंघात या दोन्ही प्रमुख उमेदवारांशिवाय आणखी एका उमेदवाराचे नाव चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणारा नितीन गायकवाड नावाचा हा उमेदवार क्रेन ऑपरेटर असून सातारा येथील रहिवासी आहे. सातारा येथील रहिवासी असून नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अर्ज दाखल केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

एक लाख ७२ हजार रुपयांचे कर्ज

फडणवीसांना आव्हान देण्यासाठी नागपूर दक्षिण-पश्चिम येथून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या या ३१ वर्षीय उमेदवाराचे पूर्ण नाव नितीन विश्वास गायकवाड आहे. सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघातील ते रहिवासी आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, नितीन गायकवाड हे क्रेन ऑपरेटर आहेत. त्यांच्या हातात केवळ सहा हजार रोख रक्कम असून बँक खात्यात दोन हजार रुपये जमा आहेत. त्यांच्यावर एक लाख ७२ हजार रुपयांचे कर्जही आहे. कोल्हापूरच्या शिवाजी महाविद्यालयातून त्यांनी बारावी उत्तीर्ण केली आहे. यंदा त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी अद्याप प्रचाराला सुरुवात केली नाही, मात्र येत्या दोन-तीन दिवसात जोरदार प्रचार करून दक्षिण-पश्चिम विधानसभा काबीज करण्याचा त्यांचा मानस आहे. विशेष बाब म्हणजे, २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत गायकवाड यांनी मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसघातून शिवसेनेच्या आदित्य ठाकरेविरुद्ध निवडणूक लढविली होती.

हे ही वाचा… मोदी विश्वगुरू असले तरी माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना… उद्धव ठाकरे यांचा टोला

…म्हणून निवडणुकीच्या रिंगणात

नितीन गायकवाड यांनी लोकसत्ताशी संवाद साधताना सांगितले की त्यांना फडणवीस यांची नीती पटलेली नाही. त्यांनी राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे म्हणूनच त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गरिबांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न घेऊन मतदारसंघात प्रचार करणार आहे. राज्यात चार पैसे दिले जात आहेत, मात्र वाईट पद्धतीने काढलेही जात आहे. याच सर्व बाबींचा विरोध करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे नितीन गायकवाड म्हणाले.

Story img Loader