आज समाज प्रगत झाला असला तरी महिला अत्याचारात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा कठीन स्थितीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वत:ला झोकुन देत काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे. महिला सक्षमीकरणासाठी अशीच एक ध्येयवेडी युवती सध्या महाराष्ट्रात सायकलने प्रवास करून महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहे. या युवतीचे नाव आहे आशा मालविया. कर्जबाजारी शेतकऱ्याची मुलगी असलेल्या या युवतीने महिला सक्षमीकरण तथा शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हा संदेश देण्यासाठी आतापर्यंत सायकलने ९ हजार १६५ किलोमिटरचा प्रवास केला आहे.
ही युवती सध्या चंद्रपूर जिल्ह्यातून प्रवास करत आहे. ती घराबाहेर पडली आहे त्याला सहा महिने झाले.आश्चर्य म्हणजे ९ हजार १६५ किलोमीटरचा प्रवास तिने सायकलवरून केला आहे. केवळ महिला, युवती मध्ये जनजागृती व महिला सशक्तीकरणासाठी ध्येयवेडी युवती काम करीत आहे.

हेही वाचा >>>प्रकाश आंबेडकर यांचे संघाच्या कार्यप्रणालीवर टीकास्त्र; म्हणाले, “सरसंघचालकांनी कधी…”

Video: UPSC Civil Services Rank 239 Holder Pavan Kumar Celebrates Victory
VIDEO: शाब्बास पोरा! शेतकऱ्याचा लेक झाला IAS; घरची परिस्थिती बिकट, झोपडीत राहून यूपीएससीत भरारी
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

मध्यप्रदेश राज्यातील आशा मालविया ही युवती नटाराम गावची ता.खिलचीपूर,जी राजगड येथील आहे. अवघ्या २४ वर्षीय आशाने आतापर्यंत गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंद्रप्रदेश,तेलंगणा व आता महाराष्ट्रात सायकलने भ्रमंती करीत महिला सशक्तीकरणासाठी संदेश देत आहे. ‘सायकल यात्री’ म्हणून सध्या तिची ओळख झाली आहे.पदवीधर शिक्षण घेतलेली उच्चशिक्षित तरुणी घरची परस्थिती हलाकीची वडिलांचे निधन कुटुंबात फक्त आई व बहिनीसोबत शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह हा दैनंदिन क्रम .पण सध्या देशात महिलांवर होत असलेले अत्याचार महिलांवर होणार अन्याय युवतींपुढे असणाऱ्या समस्यां अनेक प्रश्न तिला भेडसावत होते त्यामुडे सायकलने प्रवास करून आदिवासी,ग्रामीण,शहरी भागात जाणे स्थानिक संस्था,शाळा,सरकारी यंत्रणेतील अधिकारी ,सामाजिक कार्यकर्त्यांना भेटणे व जनजागृती उद्देश ठेऊन सवांद साधने परिस्थिती समजून घेणे मानसिकतेचा अभ्यास करणे आदी बाबींसाठी तिने प्रवास सुरु ठेवला असून २८ राज्यात प्रवास करून १५ आगस्टला दिल्लीत प्रवासाची सांगता करणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा >>>वर्धा : शिक्षकांचा महसूल खात्यास सवाल; म्हणे, “मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है…”

आशा सांगते की, मी कर्जबाजारी शेतकरी कुटुंबातील असून हा प्रवास माझा व्यक्तिगत आहे. कुठल्याही शासकीय किव्हा संस्थेच्या वतीने निघाली नाही.कोणाची प्रवासाला स्पॉन्सरशीप नाही.माझा प्रवास स्वजबाबदारीचा असून लोकांकडे खाणे,राहणे असते सोबत लोकच आर्थिक मदत करतात महिला सन्मानाच्या बाता सर्वच करतात मात्र उपदेश हा देण्या घेण्यापुरतेच राहिले आहे अशावेळी कुणावर अवलंबून न राहता सवय स्फूर्तीने महिला जागृतिचा लढा उभारला नव्हे तर अनेकांना ती आपल्याशी जुळवू पाहत आहे घराबाहेर पडा बोलते व्हा स्वयंरोजगार निर्माण करा.हिम्मत करा हिमतीपुढे कुठलीच समस्या टिकणार नाही मी एकटी सुरक्षित प्रवास करत आहो आपण स्वतःला असुरक्षित समजू नये हा संदेश देत आहे नक्कीच तिचा हा प्रवास प्रेरणदायी आहे.