scorecardresearch

Premium

अकोला : वारे पठ्ठ्या! त्याने शेतात लावली चक्क गांजाची झाडे, पोलिसांना कळताच…

उरळ पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम जुना अंदुरा येथे श्याम नारायण कुलकर्णी (५०) याने त्याच्या शेतात चक्क अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात उघडकीस आला.

cannabis gram Juna Andura
अकोला : वारे पठ्ठ्या! त्याने शेतात लावली चक्क गांजाची झाडे, पोलिसांना कळताच… (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

अकोला : उरळ पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम जुना अंदुरा येथे श्याम नारायण कुलकर्णी (५०) याने त्याच्या शेतात चक्क अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड केल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात उघडकीस आला. अंमली पदार्थ गांजाची विक्रीसुद्धा तो करीत होता. पोलीस पथकाने शेतातून चार गांजाची झाडे व तीन किलो दहा ग्रॅम गांजा हस्तगत केला.

हेही वाचा – “मी वित्तमंत्री… ओबीसींचे वसतिगृह, शिष्यवृत्तीसाठी मला भीक द्या”, ओबीसींचे अनोखे आंदोलन

Three were beaten up on the pretext of selling copper wire
तांब्याची तार विकण्याच्या बहाण्याने बोलावून तिघांना मारहाण; धुळे जिल्ह्यात दोन जण ताब्यात
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र
sheep killed wolf attack
सांगली : लांडग्यांच्या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार, २० गायब
police conducted raid on edible oil factory
नागपूर: खाद्य तेलाच्या कारखान्यावर पोलिसांचा ‘नाट्यपूर्ण’ छापा, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

हेही वाचा – अकोल्यात ‘लम्पी’ प्रादुर्भावात सातत्याने वाढ; १० कि. मी. क्षेत्रामध्ये…

बाळापूर तालुक्यातील जुना अंदुरा येथे श्याम नारायण कुलकर्णी याच्या शेतात एकूण चार गांजाची जिवंत झाडे व विक्रीसाठी बाळगून असलेला अंमली पदार्थ गांजा एकूण तीन किलो १० ग्रॅम आढळून आला. त्याची किंमत अंदाजे ४१ हजार रुपये असून इतर साहित्यदेखील आढळून आले. आरोपीकडून गांजा जप्त करून पुढील कारवाई करीता जप्त मुद्देमाल व आरोपी उरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A farmer grows cannabis in a field in gram juna andura ppd 88 ssb

First published on: 21-09-2023 at 13:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×