scorecardresearch

नागपूर : मुलीला भेटायला आलेल्या प्रियकराला बघताच वडिलांचा संताप अनावर आणि..

मुलीला भेटायला घरी आलेल्या तिच्या प्रियकराला बघून संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी लोखंडी सळाखीने त्याच्यावर हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

father attack daughter boyfriend kalmeshwar
मुलीला भेटायला आलेल्या प्रियकराला बघताच वडिलांचा संताप अनावर आणि.. (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : मुलीला भेटायला घरी आलेल्या तिच्या प्रियकराला बघून संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी लोखंडी सळाखीने त्याच्यावर हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रेयसीच्या वडिलावर गुन्हा दाखल केला.

कळमेश्वरमध्ये राहणाऱ्या प्रिया (काल्पनिक नाव) या २६ वर्षीय तरुणीचे गावातील हरिष नावाच्या युवकाशी गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्याही प्रेमप्रकरणाची चर्चा गावभर होती. त्यामुळे ते बिनधास्त गावातील उद्यानात भेटत होते. अनेकांना ते दोघेही एकत्र दिसल्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा कुटुंबियांपर्यंत गेली. त्यामुळे मुलीची तिच्या आईवडिलांनी समजूत घातली. तिला प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. मात्र, मुलगी ऐकायला तयार नव्हती. त्यामुळे तिलाही वडिलांनी अनेकदा मारहाण केली.

हेही वाचा – वर्धा: अखिल भारतीय काँग्रेस समितीवर महाराष्ट्रातून तब्बल शंभर सदस्य

हेही वाचा – यवतमाळ: “थँक्यू मिस्टर शिंदे..!” एका शिवसैनिकाचे पत्र तुफान व्हायरल

१६ फेब्रुवारीला प्रियाच्या घरातील सर्व जण शेतात गेले होते. त्यामुळे तिने हरिषला घरी भेटायला बोलावले. दुपारी १ वाजता हरिष हा प्रियाच्या घरी पोहोचला. तासभर त्यांनी गप्पागोष्टी केल्या. नेमके त्याच वेळी प्रेयसीचे वडिल घरी आले. दोघेही त्यांना नको त्या स्थितीत दिसले. त्यामुळे त्यांनी घरातून लोखंडी सळाख आणली आणि त्या प्रियकराला मारहाण केली. रक्तबंबाळ झालेला प्रियकर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने प्रेयसीच्या वडिलांनी मारहाण केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 20:21 IST
ताज्या बातम्या