बुलढाणा : चिखली शहरातील शिंदे हॉस्पिटल नजीकच्या खाजगी गोदामाला आज दुपारी अकस्मात आग लागली. यामुळे रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. यात मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने प्राणहानी झाली नाही.
आज दुपारी शिंदे हॉस्पिटल परिसरातील जालना रोडवर असलेल्या सौरभ जैन यांच्या गोदामाला आग लागली. शॉटसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हॉस्पिटलला लागून असलेल्या दहिगाव इंडियनच्या गोडाऊनला आग लागली. गोडावून मधील कापडाच्या गाठी व प्लास्टिकचे कव्हरमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहे.