बुलढाणा: Samruddhi Highway strange accident अपघात मार्ग ठरलेल्या समृद्धी महामार्गावर आज झालेल्या विचित्र परंतु दुर्देवी अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तिघे मृत देऊळगाव तालुक्यातील व एका परिवारातील असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. समृद्धी वर मेहकर नजीकच्या फरदापुर नजीक आज रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. मुळचे डीग्रस येथील रहिवासी व सध्या देऊळगाव मही ( देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा) येथील मान्टे परिवारातील तिघे जण आपल्या वाहनातून वाशिम येथे गेले होते. ते घरी परत असताना फरदापुर नजीक वाहनातून खाली उतरले. दरम्यान याचवेळी भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना त्यांना धडक दिली. यामुळे तिघांचा मृत्यू ओढवला. मृतकामध्ये पिता, पुत्र व पुतण्याचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.