scorecardresearch

Premium

शिक्षकी पेशाला काळीमा! अमरावतीतील नामांकित शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल

इर्विन चौक परिसरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने इयत्‍ता पाचवीत शिकणाऱ्या मुलीच्‍या शरीराला आक्षेपार्ह स्‍पर्श करून (बॅड टच) विनयभंग केल्‍याचा प्रकार घडला आहे.

girl student molested amravati
शिक्षकी पेशाला काळीमा! अमरावतीतील नामांकित शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल (प्रातिनिधिक छायाचित्र)

अमरावती : येथील इर्विन चौक परिसरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने इयत्‍ता पाचवीत शिकणाऱ्या मुलीच्‍या शरीराला आक्षेपार्ह स्‍पर्श करून (बॅड टच) विनयभंग केल्‍याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षक मर्विन हेंड्री जोसेफ (३५, रा. तपोवन, अमरावती) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

हेही वाचा – “तिला सुखरूप माहेरी जावू द्या…”, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

Physics Wala Teacher Beaten By Chappal In Class Angry Student Reaction During live Class Shocks Netizens Kalesh Video
Video: ‘Physics Wala’ च्या शिक्षकाला भरवर्गात विद्यार्थ्याकडून चपलेने मारहाण! नेमकं कारण काय?
Aromira Nursing College
अरोमिरा नर्सिंग कॉलेज फसवणूक प्रकरण : महाविद्यालयाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थिनीला; मूळ कागदपत्राअभावी विद्यार्थिनीची…
crime
आश्रमशाळेत शिक्षकाडून सहा आदिवासी विद्यार्थिनींची छेड; पोलिसांनी मुसक्या आवळल्या
ashram school students
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांला अधीक्षकाकडून बेदम मारहाण

हेही वाचा – स्मशानात पाणी, लाकडे ओली; नागपुरात अंत्यसंस्कारासाठी अडचणी

याबाबत शाळेच्‍या प्राचार्यांच्‍या तक्रारीच्‍या आधारे शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदविला आहे. पीडित मुलीने सुरुवातीला तिच्‍या कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. पालकांनी शाळेतील प्राचार्यांना भेटून तक्रार दिली. त्‍यानंतर प्राचार्यांनी संबंधित शिक्षकाला बोलावून समज दिली. पालकांनी या शिक्षकाच्‍या विरोधात कारवाई करा, असे सांगितले. पण, सायंकाळी पालकांनी शिक्षकाच्‍या विरोधातील तक्रार मागे घेतली. त्‍यानंतर शाळा समितीने शाळेतील इतर विद्यार्थिनींना विश्‍वासात घेऊन वस्‍तुस्थिती जाणून घेतली. अखेरीस प्राचार्यांनी शिक्षकाच्‍या विरोधात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे पालकांमध्‍ये संताप व्‍यक्‍त केला जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A girl student was molested by a teacher in a reputed school in amravati mma 73 ssb

First published on: 23-09-2023 at 13:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×