scorecardresearch

खळबळजनक! पतीने मद्यधुंद अवस्थेत पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून पेटत्या शेकोटीत फेकले

हत्येच्या अगोदर पती आणि पत्नीमध्ये मोठा वाद झाला होता. या वादतूनच आरोपी पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिची हत्या केली. आणि त्यानंतर तिला पेटत्या शेकोटीत फेकले.

खळबळजनक! पतीने मद्यधुंद अवस्थेत पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून पेटत्या शेकोटीत फेकले
पतीने मद्यधुंद अवस्थेत पत्नी डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या (प्रातिनिधिक फोटो)

दारूच्या नशेत पतीने पत्नीचा खून करून तीला पेटत्या शेकोटीत फेकून दिला. ही खळबळजनक घटना कळंब तालुक्यातील खोरद येथे बुधवारी मध्यरात्री घडली. शोभा मारोती झोरे (३८) असे मृत महिलेचे नाव आहे तर मारोती महादेव झोरे (४२) असे मारेकरी पतीचे नाव आहे.

हेही वाचा- भंडारा : गुपचूप पतीच्या दुसऱ्या लग्न सोहळ्यात पोहचली पहिली पत्नी, मग झाले असे की…

झोरे दाम्पत्य दररोज रात्री शेतात जागलीला जायचे. बुधवारी रात्री ते जागलीला गेले. तेव्हा दोघांत वाद झाला. पती मारोती याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यावर कुर्‍हाडीने हल्ला करून खून केला. त्यानंतर तिला पेटत्या शेकोटीत फेकले. ही घटना सकाळी एका महिलेच्या लक्षात आली. त्यानंतर कळंब पोलिसांना माहिती देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अभय चौथनकर, जमादार संजय रामगडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून मारोती झोरे याला अटक करण्यात आली. पुढील तपास कळंबचे ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 13:19 IST

संबंधित बातम्या