scorecardresearch

Premium

हृदयविकाराच्या धक्क्याने जवानाचा मृत्यू

एक महिन्याच्या आत गोंदिया जिल्ह्यातील लोधी समाजाच्या दोन विरपुत्रांचे निधन झाले. देवीप्रसाद यांच्या निधनाने गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Lodhi Deviprasad Radhelal
गोंदिया तालुक्यातील महालगाव येथील निवासी लोधी देवीप्रसाद राधेलाल

गोंदिया : गोंदिया तालुक्यातील महालगाव येथील निवासी व भारतीय सैन्य दलात कार्यरत लोधी देवीप्रसाद राधेलाल (मुन्ना) लिल्हारे (वय ४१) यांचे आज ३ ऑक्टोबरला सकाळी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. एक महिन्याच्या आत गोंदिया जिल्ह्यातील लोधी समाजाच्या दोन विरपुत्रांचे निधन झाले. देवीप्रसाद यांच्या निधनाने गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. देवीप्रसाद हे हिमाचल प्रदेश येथील सिमला येथे सैन्य दलात हवालदार होते. आज सकाळी कवायती दरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर बुधवार ४ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या स्वगावी महालगाव येथे येईल. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

Hand furnaces destroyed
नाशिक : देवळा तालुक्यात हातभट्ट्या उदध्वस्त
Buldhanekar Soham dies due to lightning shock
VIDEO: ओडिशात गणपती आगमनाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून बुलढाण्यातील सोहमचा मृत्यू
marathwada irrigation projects
मराठवाड्यातील कोरड्या सिंचनाच्या दुसऱ्या भागाचे ‘ढोलताशे’
inspiring story orphan blind girl manas orphan daughter of shankar baba papadkar succeeds in mpsc exam
शंकरबाबा पापळकरांच्या मानस कन्येचे ‘एमपीएससी’त यश…कचरा पेटित सापडलेल्या मुलीचा…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A jawan dies of heart attack a resident of mahalgaon in gondia taluka sar 75 ysh

First published on: 03-10-2023 at 18:04 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×