चंद्रपूर : मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीची अत्याचारानंतर निर्घृण हत्येच्या दुर्देवी घटनेनंतर राज्यातील सर्व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाच्या पाहणीचे आदेश देण्यात आले आहेत. चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाची पाहणी पोलीस अधिकारी व महाविद्यालयाच्या संयुक्त समितीने केली. तसेच यासंदर्भातील अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे.

अकोला येथील रहिवासी असलेली मुलगी मुंबईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. सावित्रीबाई फुले वसतिगृहात ती वास्तव्याला होती. तिथे तिच्यावर अत्याचार झाला, त्यानंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या दुर्देवी घटनेचे संपूर्ण राज्यात पडसात पडले आहेत. दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या घटनेनंतर राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाची पाहणी करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशानुसार आज शुक्रवारपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींच्या वसतिगृहाची पाहणी संयुक्त समितीव्दारे केली जात आहे. चंद्रपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पोलीस अधिकारी लांबट, दोन महिला पोलीस अधिकारी तथा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुदर्शन बुटले, प्रा,राजेश पेचे, प्रा,पाटील, मुलांच्या वसतिगृहाचे निरीक्षक लोकेश निखाते व मुलींच्या वसतिगृहाचे निरीक्षक प्रा.रेखा चहारे यांच्या समितीने वसतिगृहाची पाहणी केली. या पाहणीत मुलींच्या वसतिगृहात दोन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची सूचना समितीने केली आहे. तसेच वसतिगृहाला संरक्षण भिंत करण्याची सूचनादेखील या समितीने केली आहे. ही समिती आता दर तीन महिन्यांनी वसतिगृहाची पाहणी करणार आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश

हेही वाचा – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत आर्थिक अनियमितता; बँकेच्या अध्यक्षांचा ‘हा’ आहे दावा

वसतिगृहात वास्तव्याला असलेल्या मुलींची नोंद, त्यांचे आधार कार्ड, स्थायी पत्ता, मोबाईल नंबर यासोबतच वसतिगृह सोडताना त्यांना कुठे जात आहे याचे कारण सांगावे लागणार आहे. केवळ मुलींच्याच नाही तर मुलांच्या वसतिगृहाचीदेखील पाहणी यावेळी केली गेली. दरम्यान या समितीने खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहाचीदेखील पाहणी करावी अशीही सूचना समोर आली आहे. या समितीने वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर तात्काळ अहवाल शासनाला पाठविला आहे.