मेडिकलला होता दाखल, आईला अश्रू अनावर

नागपूर: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मेडिकलच्या वार्डातच निष्ठूर पित्याने दोन दिवसांच्या स्वत:च्या मुलाला ३१ डिसेंबरला आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या कवटीचे हाड मोडलेल्या चिमुकल्याचा मेडिकलच्या अतिदक्षता विभागात जीवनरक्षक प्रणालीवरील ११ दिवस  मृत्यूसी संघर्ष सुरू होता. अखेर बुधवारी सकाळी ११ वाजता चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही माहिती एकूण आईला अश्रू अनावर झाले.

निष्ठूर पित्याने ३१ डिसेंबर २०२२ रोजी चिमुकल्याचा खून करण्याचा प्रयत्नात मेडिकलच्या वार्डात फरशीवर फेकले होते. त्यानंतर हा आरोपी तेथून पसार झाला होता. परंतु पोलिसांनी त्याला नंतर शिताफीने अटक केली. दरम्यान वार्डातील डॉक्टर-परिचारिकांनी चिमुकल्याला नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात हलवले. क्ष-किरण तपासणीत चिमुकल्याच्या कवटीच्या हाडाला फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले. मुलाला प्राथमिकदृष्ट्या श्वास घेता येत असला तरी खबरदारी म्हणून जीवनरक्षण प्रणालीवर ठेवले गेले होते.

in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा
Pune, NCP Office bearers, Son, Attacked, Gang, koyata, Dandekar Pool, Six Arrested, crime news, police, politics
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला; दांडेकर पूल परिसरातील घटना, सहाजणांना अटक

हेही वाचा >>> ‘हे बाळ माझे नाही, सांग कुणाचे पाप’ असे म्हणत बाळालाच बेडवरून…

दरम्यान येथील डॉक्टरांपासून निवासी डॉक्टरांकडून सातत्याने मानवीय दृष्टीकोणातून चिमुकल्यासह तिच्या आईकडेही लक्ष दिले जात होते. आईचे वेळोवेळी समुपदेशनही केले जात होते. मुलाने सलग अकरा दिवस जिवनरक्षण प्रणालीवर जिवन- मृत्यूशी संघर्ष केला. अखेर बुधवारी सकाळी ११ वाजता त्याचा मृत्यू झाला. ही माहिती कळल्यावर आईचे अश्रू अनावर झाले आहे. तिचे अश्रू थांबत नसल्याने डॉक्टरांसह नातेवाईकांकडूनही तिचे समुपदेशन केले जात आहे. या वृत्ताला मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनीही दुजोरा दिला.