देवदर्शनाला जाताना ऑटोचालकाशी ओळख झाल्यानंतर त्याने विवाहित महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सलमान रहिम शेख (३२, गोबरवाही, जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मोनाली (काल्पनिक नाव) ही ‘एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती विवाहित असून नोव्हेंबर २०२० मध्ये पती व कुटुंबीयांसह एका ऑटोने देवदर्शनाला गेली होती. त्या ऑटोवर आरोपी सलमान शेख हा चालक होता. तो दिवसभर मोनालीच्या कुटुंबासह होता. दरम्यान, त्याने मोनालीशी ओळख वाढवली. त्याने तिचा मोबाईल क्रमांक घेतला. तो तिला वारंवार फोन करून ओळखी वाढवत होता.
हेही वाचा >>>“…तर ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका”, प्रविण तोगडीयांचं मोठं विधान, म्हणाले, “मोदी-शाहांनी…”
त्यानंतर पुन्हा एकदा नातेवाईकाकडे धार्मिक कार्यक्रमाला जायचे असल्याने सलमानचा ऑटो सांगण्यात आला. तेव्हापासून तो तिच्या घरीसुद्धा यायला लागला. त्याने त्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिचा पती कामावर गेल्यावर तो तिला भेटायला घरी येत होता. त्याने तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून पतीला सोडण्याचा सल्ला दिला. कोणतेही कारण नसताना पतीला सोडू शकत नसल्याचे सांगून तिने काही दिवस लोटले. यादरम्यान त्याने मोनालीचे लैंगिक शोषण सुरू केले. तिला अनेकदा बाहेर फिरवायला घेऊन गेला. तिच्या अनैतिक संबंधाची चर्चा परिसरात होऊ लागली. त्यामुळे पतीला कुणकुण लागल्यानंतर घरी वाद व्हायला लागले. त्यामुळे सलमानशी तिने चर्चा केली आणि पतीला सोडण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा >>>“काही लोक नोंदणी करूनही…”; अमोल मिटकरींचा नाव न घेता रणजीत पाटलांना टोला!
सलमानने तिला पतीला सोडल्यानंतर लग्न करण्याचे आश्वासन दिले. ती पतीला सोडून सलमानसोबत पळून गेली. तिला सलमानने नवीन कामठी परिसरात एक खोली करून दिली. २०२० ते २०२२ असे दोन वर्षे तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून लैंगिक संबंध प्रस्थापित केले. तसेच महिलेच्या माहेरून आणलेले १ लाख ५० हजार रुपयेसुद्धा सलमानने तिच्याकडून हडपले. तिने लग्नासाठी तगादा लावला असता लग्नास नकार देऊन त्याने पळ काढला. तो अचानक पळून गेल्यामुळे मोनालीने नवीन कामठी पोलीस ठाणे गाठले आणि सलमानविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी बलात्कार आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.