सख्ख्या भावानेच आपल्या लहान बहिणीवर बलात्कार केल्याची घटना उजेडात आली असून या प्रकरणी अल्पवयीन आरोपी भावाला ताब्यात घेण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलीचे पोट दुखत असल्याने आईवडील तिला सेवाग्रामच्या रुग्णालयात घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टरांना धक्का बसला. कारण, ही पंधरा वर्षीय मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. आईवडील बाहेर गेले असता तिच्या सतरा वर्षीय भावाने बळजोरी केली. त्यातून तिला दिवस गेले. हे कळताच कुटुंबीयांनी तडक वर्धा शहर ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी भावाला ताब्यात घेतले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor brother rapes a minor sister amy
First published on: 25-07-2022 at 17:12 IST