scorecardresearch

वाशीम : वादळाच्या तडाख्याने १५० वर्षांपेक्षा अधिक जुने पिंपळाचे झाड कोसळले; गहू, आंब्याचे नुकसान

वाशीम तालुक्यातील कोकलगाव येथील जवळपास १५० वर्षांपेक्षा जुने पिंपळाचे झाड कोसळले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु दुचाकीचे नुकसान झाले.

pimpal tree fell storm Kokalgaon
वादळाच्या तडाख्याने १५० वर्षांपेक्षा अधिक जुने पिंपळाचे झाड कोसळले; गहू, आंब्याचे नुकसान (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

वाशीम : हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला असून, जिल्ह्यात सहा मार्च रोजी सायंकाळनंतर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. वाशीम तालुक्यातील कोकलगाव येथे जवळपास १५० वर्षांपेक्षा अधिक जुने असलेले पिंपळाचे झाड कोसळले. गहू आणि आंब्याच्या पिकांना काही प्रमाणात फटका बसला, तर कुठे वीज पुरवठा खंडीत झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा – अवकाळी मुसळधार; चना गहू कोसळला, आंबेमोहोर गळाला, होळी विझल्या

हेही वाचा – विश्लेषण: नागपूरला होणाऱ्या सी-२० बैठकीचे महत्त्व काय?

जिल्ह्यात ६ मार्च रोजी सायंकाळनंतर अचानक सोसाट्याचा वारा सुटला. रात्री काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. तालुक्यातील काही भागांत नुकताच मोहरलेल्या आंब्याचे नुकसान झाले, तर गहू व इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. वाशीम तालुक्यातील कोकलगाव येथील जवळपास १५० वर्षांपेक्षा जुने पिंपळाचे झाड कोसळले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु दुचाकीचे नुकसान झाले. आज (७ मार्च) दुपारपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वातावरणात गारवा जाणवत होता, तर कुठे हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 13:59 IST
ताज्या बातम्या