scorecardresearch

Premium

नागपूर : लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात नवविवाहितेने संपवले जीवन….

लग्नाच्या जेमतेम दोन महिन्यांतच नवविवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोराडीत उघडकीस आली.

newly married woman committed suicide
नागपूर : लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात नवविवाहितेने संपवले जीवन…. (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : लग्नाच्या जेमतेम दोन महिन्यांतच नवविवाहितेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोराडीत उघडकीस आली. वर्षा ऊर्फ सीमा मंगेश कडू (२६, श्री. गजानन अपार्टमेंट, प्रेमनगर, कोराडी) असे मृत महिलेचे नाव आहे.

मंगेश कडू हा एका राजकीय पुढाऱ्याच्या खासगी कार्यालयात लिपिक आहे. त्याचे पहिले लग्न झाले होते. पहिल्या पत्नीकडून एक मुलगी असून सध्या घटस्फोट झाला आहे. दरम्यान, त्याची नातेवाईक असलेली वर्षा हिच्याशी ओळख झाली. वर्षाचेही पहिले लग्न झाले होते. तीसुद्धा घटस्फोटीत असून एकटी राहत होती.

prison rape 15 year girl
आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार
Yash Chouhan Delhi Murder Case
पैशांच्या व्यवहारातून मित्रांनीच केला घात, दिल्लीतील पोलीस आयुक्ताच्या मुलाची हत्या
nagpur, gold prices, gold price declined marathi news,
खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, असे आहेत आजचे दर…
Youth arrested for killing teacher in Virar
विरार मध्ये शिक्षकाची हत्या, तरुणाला अटक

हेही वाचा – राष्ट्रपतींच्या उपराजधानीतील दोन्ही कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दांडी, चर्चांना उधाण…

हेही वाचा – ‘डीपफेक’ व्हिडीओवर राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, “तंत्रज्ञानाचा वापर…”

मंगेश आणि वर्षा यांनी दोन महिन्यांपूर्वी लग्न केले. कोराडीत एका सदनिकेत दोघांनीही संसार सुरु केला. मात्र, महिन्याभरातच दोघांचे क्षुल्लक कारणावरून खटके उडायला लागले. त्या रागातून वर्षाने शुक्रवारी सायंकाळी घरात कुणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगेश घरी आला असता पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A newly married woman committed suicide by hanging herself in her house this incident was revealed in koradi adk 83 ssb

First published on: 02-12-2023 at 17:02 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×