नागपूर : मुसळधार पावसामुळे सुरेंद्रगडच्या खालच्या भागात पावसाचे पाणी घरात शिरले. पहाटे ४ वाजतानंतर जोरदार प्रवाहामुळे पाण्याचा स्तर वाढतच गेला. एक लकवाग्रस्त महिला घरातच अडकून पडली आणि झापेतच तिचा बुडून मृत्यू झाला. तिला ना प्रशासनाकडून मदत मिळाली आणि ना परिसरातील नागरिक तिची मदत करू शकले. संध्या श्याम ढोरे (५३) रा. सुरेंद्रगड असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील पूरस्थितीची पाहणी; नुकसानभरपाईबाबत म्हणाले…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – ‘ऑनलाइन जॉब’ : १० हजार कमावले, पण लगेच ९२ हजार गमावले

संध्या ढोरे या आपली आई सयाबाई (८०) यांच्यासोबत राहात होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांना लकवा झाला होता. त्या चालू शकत नव्हत्या. शेजारीच त्यांचे नातेवाईकही राहतात. मध्यरात्रीनंतरच्या मुसळधार पावसामुळे परिसरातील घरांमध्ये पाणी शिरू लागले. अनेक तासांपर्यंत लोकांनी पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ४ वाजता अचानक प्रवाह वाढला. घरात शिरलेल्या पाण्याचा स्तर वाढतच चालला होता. सयाबाईला लोकांनी कसेबसे घरातून बाहेर काढले, मात्र संध्या जमिनीवर झोपलेल्या होत्या. त्यांना उचलून बाहेर काढणे परिसरातील महिलांच्या आवाक्यात नव्हते. संध्या घरातच अडकून पडल्या. अखेर पाण्यात बुडून यांचा मृत्यू झाला. सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली. गिट्टीखदान पोलीस घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा करून मृतदेह मेयो रुग्णालयात रवाना केला.

Story img Loader