नागपूर : देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. येथे गुरुवारी रात्री एका प्रवाशाचा खून झाला. यापूर्वी एका प्रवाशाच्या नातेवाईकाने बॅटरी कार चालकाला तलवार दाखवून धमकावले होते.
पोलीस शिपाई रात्री गस्तीवर असताना त्यांना फलाट क्रमांक ५ वर पहाटे पावणे तीनच्या सुमारास एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली. मृताच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या. या घटनेची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये मृत व्यक्तीला एक इसम मारत असताना दिसून आले. लागलीच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित इसमाचा शोध घेण्यात आला. तो दडून बसला होता. त्याचे नाव दिनसागर ऊर्फ दिनेश धोंडिबा सदाफुले असून तो वारजे माळवाडी रामनगर, पुणे
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.