scorecardresearch

भंडारा : भरधाव ट्रेलरच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

बाजारातून घरी परत जात असताना एका भरधाव ट्रेलरने दुचाकीवरील पोलीस कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना भंडारा शहरातील त्रिमर्ती चौकात घडली.

death 22
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

भंडारा : बाजारातून घरी परत जात असताना एका भरधाव ट्रेलरने दुचाकीवरील पोलीस कर्मचाऱ्याला चिरडल्याची घटना भंडारा शहरातील त्रिमर्ती चौकात घडली. ट्रेलरच्या चाकाखाली आल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. राजपुत मते (५६) असे मृताचे नाव आहे. पोलीस वसाहतीत राहणारे राजपूत मते हे लाखनी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत होते.

आज, रविवारी सकाळी बाजारातून भाजी घेऊन दुचाकीने घरी परत जात असताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने त्यांना धडक दिली. यात ते टिप्परच्या चाकाखाली चिरडले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर चौकात उपस्थित वाहतूक पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले. राजपूत मते यांच्या मागे २ मुले, १ मुलगी, पत्नी, आई असा मोठा आप्त परिवार आहे. विशेष म्हणजे, भंडारा शहरात २४ तासात अपघाती मृत्यूची ही दुसरी घटना घडल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 19:31 IST

संबंधित बातम्या