राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील हिंदी विभागातील मानसिक छळाचे आणि डॉ. धवनकर प्रकरण ताजे असतानाच आता विद्यापीठाशी संलग्नित नंदनवन येथील स्व. वसंतराव नाईक शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील प्राध्यापकावर १९ वर्षीय विद्यार्थिनीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. विद्येच्या मंदिरात दिवसेंदिवस असे प्रकार घडत असल्याने शैक्षणिक वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>>भंडारा : धक्कादायक! सिरेगावटोला येथील अख्खे आदिवासी कुटुंब १६ दिवसांपासून बेपत्ता

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष

याबाबत पोलिसात दाखल तक्रारीनुसार, दिल्लीतील एका १९ वर्षीय विद्यार्थिनीने स्व. वसंतराव नाईक शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील प्रथम वर्षात प्रवेश घेतला आहे. १० दिवसांपूर्वी पहिल्या सत्राची परीक्षा झाली. आरोपी विभागप्रमुख आधीपासून पीडित विद्यार्थिनीवर वाईट नजर ठेवत होते. ‘तू आंटी-४२० आहेस… तू नागपुरात कुठे राहतेस… मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन’ असे भाष्य करत होते. विद्यार्थिनीला इतर विद्यार्थ्यांपासून दूर नेत उद्धटपणे बोलत होते. परीक्षा सुरू असताना आरोपी प्राध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. यावर ती मुलगी शांत राहिली. मात्र, असे शांत राहिल्याने प्राध्यापकाचे धाडस वाढले व त्याने आणखी वाईट कृत्य केले. त्यामुळे विद्यार्थिनीच्या संयमाचा बांध फुटला. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. या प्रकाराला कंटाळून विद्यार्थिनीने नंदनवन पोलीस ठाणे गाठून प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी तिच्या बाजूने साक्ष देण्यासाठी तिच्या सुमारे आठ मैत्रिणीही सोबत होत्या.

हेही वाचा >>>“ऑस्करसाठी निवड होणे म्हणजे सर्वश्रेष्ठ चित्रपट असे होत नाही”, नागराज मंजुळेंनी व्यक्त केले मत

तक्रार मिळूनही महाविद्यालय गप्पच

विद्यार्थिनीसोबत असे असभ्य वर्तन पाहून विद्यार्थिनीच नाही तर तिच्या वर्गमित्रांमध्येही खळबळ उडाली. विद्यार्थ्यांच्या एका गटाने तक्रार लिहून त्यावर त्यांची नावे, मोबाईल क्रमांकासह स्वाक्षरी केली. याबाबतची माहिती महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आली. मात्र प्रशासनाने काहीच न केल्याने सर्व विद्यार्थ्यांनी नंदनवन पोलीस ठाणे गाठले.

या प्रकरणाची तक्रार मिळताच आम्ही प्राध्यापकाला महाविद्यालयापासून दूर राहण्यास सांगितले आहे. जोपर्यंत विद्यार्थिनी महाविद्यालयात आहे तोपर्यंत आरोपी प्राध्यापक दिसू नये, असे सांगण्यात आले आहे. आम्ही पोलिसांवर कोणताही दबाव निर्माण केलेला नाही. तक्रार मागे घेण्यात आली. आम्ही आमच्या स्तरावर तपास करीत आहोत.- गिरीश पांडव, महाविद्यालय संचालक

माझ्यावरचे आरोप निराधार आहेत. यानंतरही चुकांसाठी मी माफी मागितली आहे. तक्रार मागे घेण्यात आली आल्याने प्रकरण संपले. खरे तर मी परीक्षेदरम्यान कठारे नियम पाळले. कॉपी करण्याची संधी दिली नाही. म्हणूनच विद्यार्थी असे वागत आहेत.- आरोपी प्राध्यापक.